पाच महिन्यांत चारशेवर नाटके सेन्सॉर बोर्डाकडे

By Admin | Updated: November 12, 2015 03:14 IST2015-11-12T03:14:37+5:302015-11-12T03:14:37+5:30

नवीन नाटके रंगभूमीवर येत नाहीत तसेच चांगल्या संहिता मिळत नसल्याची ओरड होत असताना मागील पाच महिन्यांत मात्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे चारशेवर नाटके मंजुरीसाठी आली आहेत.

In five months, four plays have been played by the censor board | पाच महिन्यांत चारशेवर नाटके सेन्सॉर बोर्डाकडे

पाच महिन्यांत चारशेवर नाटके सेन्सॉर बोर्डाकडे

प्रसन्न पाध्ये,  पुणे
नवीन नाटके रंगभूमीवर येत नाहीत तसेच चांगल्या संहिता मिळत नसल्याची ओरड होत असताना मागील पाच महिन्यांत मात्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे चारशेवर नाटके मंजुरीसाठी आली आहेत. व्यावसायिक रंगभूमीच्या दृष्टीने हे निश्चित आनंददायी आहे.
सध्या वेगवेगळ्या आशय-विषयांवरील नाटके व्यावसायिक रंगभूमीवर येत आहेत. वेगळे विषय असलेल्या नाटकांना रसिकांचीही पसंती मिळत आहे. हौशी कलाकारांच्या स्पर्धा, प्रायोगिक नाट्यप्रयोग पुण्या-मुंबईत सातत्याने होत असतात. त्यांचा प्रेक्षकवर्ग वेगळा असतो. व्यावसायिक नाटकांपेक्षा प्रायोगिक रंगभूमीवरील विषय वेगळे व वास्तवदर्शी असतात. सादरीकरणाचा कालावधी तास किंवा दीड तासांपेक्षा जास्त नसतो. हेच विषय पुढे दीर्घांकाच्या स्वरुपात व्यावसायिक रंगभूमीवर येतात.
पाच महिन्यात रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे ४१६ व्यावसायिक नाटके मंजुरीसाठी आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही संख्या गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. हौशी, व्यावसायिक, प्रायोगिक नाटकांना परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र तातडीने देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. लेखक, कलावंतांना त्रास होऊ नये, हा त्या मागचा उद्देश आहे. अनेक संहिता निर्णयाविना प्रलंबित होत्या. त्याबाबतही निर्णय घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
मंडळातील सदस्याकडे नाटकाची संहिता पाठविल्यानंतर त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असते. त्यात जास्त कालावधी जाऊ नये, या दृष्टीने प्रयत्न असतो. परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत दोन-तीन महिन्यांचा कालावधी जातो. निर्णय तातडीने व्हावा, मंजुरीची निकड बघून एका सदस्याने संहिता वाचून त्याविषयी हरकती, सूचना नोंदवाव्यात, तात्पुरते प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचना केल्याचे नलावडे म्हणाले.

Web Title: In five months, four plays have been played by the censor board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.