शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीनंतर मृत मुलीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 21:34 IST

सद्भावना एकता रॅलीनंतर चक्कर येऊन मृत झालेल्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे (वय १४, रा. राजवाडा चौक, सांगली) या शाळकरी मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली.

सांगली : सद्भावना एकता रॅलीनंतर चक्कर येऊन मृत झालेल्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे (वय १४, रा. राजवाडा चौक, सांगली) या शाळकरी मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली. याबाबतची माहिती आ. सुधीर गाडगीळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. घटनेनंतर दुपारी गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली. ऐश्वर्या पोटाच्या विकाराने ग्रस्त होती व रविवारी तिची प्रकृती अधिकच बिघडल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीस यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून मुलीला आपण तातडीने पाच लाखाची मदत देऊ असे सांगितले. याबाबतची माहिती गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनाही दिली.मकरसंक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सांगलीत रविवारी सद्भावना रॅली काढण्यात आली होती. रॅली संपल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन परत निघाले होते. ऐश्वर्या कांबळे ही विद्यार्थिनीही शिक्षक, विद्यार्थ्यांसोबत स्टेशन चौकमार्गे घरी निघाली होती. ती विठ्ठल मंदिरजवळ आली असताना, चक्कर आल्याने ती रस्त्यातच खाली बसली. शिक्षकांनी तिच्या प्रकृतीची चौकशी केली. तिने वडिलांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांना बोलावून घेण्यास सांगितले. तोपर्यंत ऐश्वर्याची प्रकृती अधिकच अत्यवस्थ बनली. त्यामुळे तिला रुग्णवाहिकेमधून उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तिथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Sangliसांगली