शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

वरळी नाक्यावर पाच तास तणाव, कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 05:05 IST

- महाराष्ट्र बंदचा फटका वरळी नाका आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बसला. वरळी नाक्यावर जमलेल्या आंदोलकांनी येथील व्हीव्हीआयपी मार्ग सकाळी ११ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रोखून धरला होता.

मुंबई - महाराष्ट्र बंदचा फटका वरळी नाका आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बसला. वरळी नाक्यावर जमलेल्या आंदोलकांनी येथील व्हीव्हीआयपी मार्ग सकाळी ११ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रोखून धरला होता. पोलिसांनी येथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असले, तरी इतर भागांच्या तुलनेत येथे अधिक तणावाचे वातावरण होते़उपनगरातील बंदचे पडसाद दादरहून वरळी नाक्यापर्यंत काही वेळातच उमटले़ वरळी नाका व आजूबाजूच्या परिसरात आंदोलकांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. करी रोड आणि लोअर परेल स्थानकावरुन याठिकाणी येणाºया शेअर टॅक्सी बंद असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागली.महाराष्ट्र बंदचे सर्वात तीव्र पडसाद चेंबूरमध्ये उमटले. मंगळवारपासूनच चेंबूरमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यात सकाळी नऊच्या दरम्यान चेंबूर पूर्वेकडील पी. एल. लोखंडे मार्गावर सोफा जाळण्यात आला. ११ वाजता येथील स्कूलबस झालेल्या दगडफेकीनंतर ठिकठिकाणी हिंसक आंदोलन पेटले.३२ विमान उड्डाणे रद्दमहाराष्ट्र बंदचा फटका विमान प्रवाशांनादेखील बसला. बंदमुळे १६ विमानांचे आगमन आणि १६ विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती मुंबई विमानतळ प्राधिकरणाने दिली. तसेच बुधवारी विमानतळावरूनघरी जाणाºया प्रवाशांनादेखील मानसिक त्रास सहन करावा लागला. विमानतळाहून घरी जाण्यासाठी टॅक्सी, वातानुकूलित टॅक्सी किंवा अ‍ॅप बेस टॅक्सी उपलब्ध नव्हत्या. रिक्षांचीही वानवा होती. प्राधिकरणाने टर्मिनस १ व २वरून प्रवाशांना जवळच्या स्थानकावर पोहोचवण्यासाठी बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र रस्त्यावरील एकंदर परिस्थिती पाहता अनेक प्रवाशांनी विमानतळ परिसरातच सुरक्षितपणे राहणे पसंत केले.कोणाचीही गय केली जाणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोरेगाव भीमा येथे जी काही घटना घडली आहे, त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले.कोरेगाव भीमा येथील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी सायंकाळी माध्यमांशी बोलत होते. भीमा कोरेगावजवळ सणसवाडीतील घटनेवर सरकारची भूमिका नव्याने स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरेगाव भीमा येथील घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माननीय उच्च न्यायालयाकडे आम्ही जात आहोत. याप्रकरणी चौकशीसाठी विद्यमान न्यायमूर्तींची नियुक्ती व्हावी अशी आम्ही विनंती करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.८५ तास ‘ते’ उभेच...थर्टीफर्स्टच्या पहाटे ४ वाजल्यापासून सुरु झालेला बंदोबस्त, १ जानेवारी भीमा कोरेगाव घटना आणि त्याच्या निषेधार्थ आंदोलने आंणि बंदच्या काळात तैनात असलेले पोलीस ८५ तासांहून अधिक वेळ उभाच असल्याची परिस्थितीही तितकीच खरी. लांब राहणाºया पोलिसांनी बंदोबस्तामुळे पोलीस ठाण्यातच राहिले. कुठलीही तक्रार न करता पोलिसाने ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. हे तितकेच कौतुकास्पद आहे.आज गुजरात बंद?मुंबई : कोरेगाव भिमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्टÑ बंद आंदोलन करण्यात आले. त्याच प्रकारे ४ जानेवारी रोजी या घटनेच्या निषेधार्थ गुजरात बंद ठेवण्यात येणार असल्याचे गुजरात मधील अनेक संघटनांनी जाहिर केले आहे. या संघटनांमध्ये गुजरात मधील दलित संघटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. समता सैनिक दल, गुजरात दलित संघटन, दलित अधिकार आंदोलन, बहुजन वोलन्टरी फोर्स, दलित युवा विकास संगठन, सौराष्ट्र दलित संगठन अशा ३० हून अधिक संघटनांनी गुजरात बंदची हाक दिली आहे.एकबोटे, भिडेंविरोधात आणखी एक तक्रारच्पुणे : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात बुधवारी येरवडा पोलिस ठाण्यात आणक़जखी एक तक्रार अर्ज आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी ही तक्रार दिली असून ती शिक्रापूर पोलिस ठाण्याकडे वर्ग केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी दिली. याअगोदर दोघांवर मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरेगाव भीमा येथे जो काही घटनाक्रम घडला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे, असे नमूद करताना मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सर्वांनी शांतता राखावी. दोन समाज समोरासमोर येणार नाहीत याची दक्षता सर्वांनीच घ्यावी. माध्यमांनीही पहिल्या दिवसापासून जो संयम दाखवला तो यापुढेही दाखवावा व शांतता राखण्यास हातभार लावावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.राज्यभरातील बंद व कोरेगाव भीमामधील घटनेच्या दरम्यान पोलिसांनी संयमाने स्थिती हाताळली. कुठेही लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केला नाही. हा संवेदनशील विषय असल्याने तो संयमाने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व घटनेचा योग्य पद्धतीने तपास केला जाईल, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.विद्यापीठाला दुपारनंतर जागमुंबईसह राज्यात बंदचे पडसाद सकाळपासूनच उमटायला सुरुवात झाली होती, पण तरीही विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलणार नसल्याचे जाहीर केले, त्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण होता. परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकल्यास काय करायचे? याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. विद्यापीठाने सकाळच्या सत्रातील ४ परीक्षा घेतल्याच, पण दुपारनंतर राज्यासह मुंबईवरचा ताण वाढताना पाहून विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला. दुपारी २ वाजता परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येतील, असे विद्यापीठाने जाहीर केले. कलिना बॉम्बे कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालात काही आंदोलक घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. महाविद्यालय बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली. पण, महाविद्यालय बंद न करण्याचा निर्णय विद्यालय प्रशासनाने घेतला. विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना महाविद्यालयातच काही वेळ थांबवून ठेवण्यात आले होते.रुग्णालयातील गर्दी ओसरलीशहर-उपनगरांतील जे. जे. रुग्णालय, केईएम, नायर, सायन रुग्णालयांत मुंबईबाहेरून उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्ण येत असतात. मात्र, बुधवारी ‘महाराष्टÑ बंद’च्या पार्श्वभूमीवर ‘रेल रोको’ झाला. त्याचप्रमाणे, पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गही वाहतुकीस बंद झाल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे एरव्ही दररोज जवळपास ८ हजार रुग्ण केईएम रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात. मात्र, बंदचा फटका बसल्याने केवळ ३ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद