मुंबई : शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे लढवत असलेल्या वरळी मतदारसंघात तब्बल पाचवेळा ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. हा एक प्रकारच विक्रमच असून ऐन गर्दीच्या वेळी ईव्हीएम बिघडल्याने मतदानावर मोठा परिणाम झाला आहे.
वरळी मतदारसंघातील 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे निवडणूक अधिकारी आणि पोलिसांची धावपळ उडाली असून मतदाराना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन तासांपासून मतदार मशीन सुरू होण्याची वाट पाहत आहेत. काही मतदारांनी तिथेच थांबून राहण्यापेक्षा घरी जाणेच पसंत केले आहे.