पाच डमी ईव्हीएम मशिन जप्त

By Admin | Updated: February 22, 2017 04:42 IST2017-02-22T04:42:42+5:302017-02-22T04:42:42+5:30

मतदान आटोपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी प्रभाग १५ मधील भाजपाच्या उमेदवार सुजाता देवराव अहीर

Five dummy EVM machines seized | पाच डमी ईव्हीएम मशिन जप्त

पाच डमी ईव्हीएम मशिन जप्त

अकोला : मतदान आटोपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी प्रभाग १५ मधील भाजपाच्या उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापा टाकून पाच डमी ईव्हीएम मशीन जप्त केल्या. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी छापा टाकून ही कारवाई केली.
सुजाता अहीर, त्यांचे पती देवराव अहीर यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी चौकशी सुरू केली आहे. मतदान सुरू असताना प्रिया पाटील प्रभाग १५ मधून जात असताना त्यांना सुजाता अहीर यांच्या घरी गर्दी दिसली. त्यांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्याचवेळी देवराव अहीर तेथे आले. त्यांनी पाटील यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावून त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात पाच डमी ईव्हीएम मशीन मिळून आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Five dummy EVM machines seized