नागपूरच्या कारागृहातून ५ आरोपी फरार

By Admin | Updated: March 31, 2015 13:00 IST2015-03-31T11:01:32+5:302015-03-31T13:00:47+5:30

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच आरोपी पळून गेले असून तीन आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहे.

Five accused absconding from Nagpur prisons | नागपूरच्या कारागृहातून ५ आरोपी फरार

नागपूरच्या कारागृहातून ५ आरोपी फरार

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३१ - नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच आरोपी पळून गेले असून तीन आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहे. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास हे पाचही आरोपी गज कापून फरार झाल्याचे समोर येत आहे. बिशनसिंग धुमाळ,  मोहम्मद साहिब सलमी खान, सत्येंद्र उर्फ राहुल गुप्ता, प्रेम उर्फ नेपाळी शालीग्राम आणि आकाश उर्फ गोलू ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत.
या पाचही आरोपींवर १५ ते २० गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तिघांवर तर मोक्का लावण्यात आला आहे.  अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेल्या कारागृहातून हे आरोपी फरार झाल्याने पोलिस प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान याप्रकरणी जेलचे अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Five accused absconding from Nagpur prisons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.