बँकॉकमध्ये नागपूरला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व

By Admin | Updated: August 29, 2014 00:57 IST2014-08-29T00:57:32+5:302014-08-29T00:57:32+5:30

बँकॉकमध्ये ‘एक्स्प्रेस मेल सर्व्हिस’वर आयोजित कार्यशाळेत पहिल्यांदाच नागपुरातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बँकॉकमध्ये १ ते १४ सप्टेंबरपर्यंत आयोजित या कार्यक्रमात आशिया खंडातील

For the first time in Bangkok representation in Nagpur | बँकॉकमध्ये नागपूरला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व

बँकॉकमध्ये नागपूरला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व

डाकसेवा प्रणालीवर प्रेझेन्टेशन : उपव्यवस्थापक दिलीप खाडे सहभागी होणार
नागपूर : बँकॉकमध्ये ‘एक्स्प्रेस मेल सर्व्हिस’वर आयोजित कार्यशाळेत पहिल्यांदाच नागपुरातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बँकॉकमध्ये १ ते १४ सप्टेंबरपर्यंत आयोजित या कार्यक्रमात आशिया खंडातील देशांमधील डाकसेवा प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत माहितीचे आदान-प्रदान केले जाणार आहे. यासाठी भारतातून डाक विभागातील तीन कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात तामिळनाडूतून एक महिला कर्मचारी आणि केरळ व नागपूरच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एशियन पॅसिफिक पोस्टल सेंटरच्या बँकॉक येथील मुख्यालयात यापूर्वीसुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. परंतु विदर्भातील कुठल्याही प्रतिनिधीला आजवर त्या कार्यक्रमात सहभागी होता आलेले नाही. एशियन पॅसिफिक पोस्टल सेंटरची स्थापना १९७० मध्ये झाली. संघटनेतर्फे आयोजित कार्यशाळेत आशिया खंडातील राष्ट्रांना आमंत्रित केले जाते. प्रशिक्षणादरम्यान प्रतिनिधींना डाकसेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते, सोबतच प्रतिनिधींच्या सूचनांनाही सामील केले जाते.
नागपुरातील नॅशनल स्पीड पोस्ट कार्यालयाचे उपव्यवस्थापक दिलीप खाडे यांची बँकॉकला जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. ते ३० आॅगस्ट रोजी बँकॉकसाठी रवाना होणार आहेत. डाकसेवासंबंधी ते आपले प्रेझेन्टेशनसुद्धा सादर करतील. (प्रतिनिधी)

Web Title: For the first time in Bangkok representation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.