सोलापूरचा अभयसिंह राज्यात प्रथम
By Admin | Updated: April 6, 2015 03:25 IST2015-04-06T03:25:00+5:302015-04-06T03:25:00+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परिक्षेचा रविवारी आॅनलाईन जाहीर झाला असून, सोलापूर जिल्ह्णातील मंगळवेढ्याचा

सोलापूरचा अभयसिंह राज्यात प्रथम
पुणे/मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परिक्षेचा रविवारी आॅनलाईन जाहीर झाला असून, सोलापूर जिल्ह्णातील मंगळवेढ्याचा अभयसिंह मोहिते हा ४७० गुण मिळवत राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीयांतून पुण्याचा विशाल साकोरे ४६३ मिळवून तर मुलींमधून नांदेडची वनश्री लाभशेटवार ही ४२५ गुण घेवून राज्यात पहिली आली आहे. राज्यातील ४३८ उमेदवारांची विविध सेवापदांसाठी निवड करण्यात आली आहे.
राज्य सेवेची मुख्य परीक्षा २ फेब्रुवारी २०१४ रोजी घेण्यात आली. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, कक्ष अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी या पदांचा समावेश आहे. राजेंद्र कचरे हा अल्पदृष्टी वर्गवारीत राज्यात पहिला आला आहे. राज्यभरातून उपजिल्हाधिकारी पदासाठी ४४ उमेदवार पात्र ठरले आहेत.
पोलीस उपअधीक्षक पदासाठी २४, तहसीलदार पदासाठी ३५, विक्रीकर सहआयुक्त पदासाठी ६, गटविकास अधिकारी पदासाठी ९, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा विभाग) ७, नायब तहसीलदार पदासाठी २२७ उमेदवार पात्र ठरले आहेत. निकालासाठी आवश्यक कट आॅफ गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अभयसिंह मोहिते हा अभियांत्रिकीचा पदवीधर, तर वनश्री लाभशेटवार ही वैद्यकीय पदवीधर आहे़
१ लाख ७६ हजार
२२४ विद्यार्थ्यांनी ही राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली होती. पैकी ६३९५ परीक्षार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरले होते़ त्यातून १३३७ उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. यापैकी ४३८ उमेदवारांची विविध पदांकरिता निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)