शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

महाराष्ट्राच्या राजकारणातला 'कलगीतुरा' श्रावण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 18:35 IST

महाविकास आघाडीच्या सत्तेच्या ‘विवाहबंधना’नंतरचा हा पहिलाच श्रावण....

श्रावणातील मंगळागौर पूजन व त्यानिमित्त होणाऱ्या खेळात पारंपरिक गाणी म्हटली जातात. त्या चालीवर आम्हाला काही नवी गाणी सुचली... 

बॉलीवूड ‘क्वीन'ला उद्देशून ‘राजस सुकुमार’ 

पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा..!

ट्विटच्या पिंग्यानं तुझ्या सतावलं, रात जागवली पोरी पिंगा !

ट्विट करतेस गं, ब्रेकिंग होते गंखेळ तुझा गं, पोरी पिंगा

तुझ्या पिंग्याची 'दिशा' भलतीच गंवाजवे ‘कंगना’ तू, पोरी पिंगा !

खेळतो पेंग्विनशी, नाही जिवाशी‘नाइटलाइफ’लाच घालतो पिंगा

तू ‘राणी झाशीची’ सोड मला गं‘सैनिक’ नवखा मी, पोरी पिंगा

पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा !

----------

माजी ‘सीएम’बाईंना उद्देशून

फू बाई फू फुगडी फू‘अमृता’ ट्विट-ट्विट करतेस तू

ट्विट बाई, ट्विट सारखं ट्विटपतिदेवांना तू आणतेस वीट

घुमू दे ट्विटर घुमू दे खेळात जीव ह्यो रमू दे

गडनी ट्विटर फुकतिया, 'देवेंद्रा'चं सिंहासन हलतंया

नाचून-गाऊन बाई दमू दे, ‘देवेंद्रा’ला दुसरं काही सुचू देत्याच्या सोयीचं ट्विटर घुमू दे !

------------

'महाविकास आघाडी'ताईला उद्देशून

नाच गं घुमा, कशी मी नाचू ?

ह्या गावचा, त्या गावचा कोरोना न्हाई गेला‘अनलॉक’ न्हाई झाला, कशी मी नाचू ?

नाच गं घुमा ! ह्या गावचा, त्या गावचा बाजार ठप्प झालापैसा न्हाई आला, कशी मी नाचू ?

नाच गं घुमा !

ह्या गावचा, त्या गावचा ‘रेडझोन’ न्हाई गेलाह्यो पाऊस आला मेला, कशी मी नाचू ?

नाच गं घुमा !

------

‘देवेंद्र’ थकतो, ‘चंदूदादा’ हात मळतो 'जाणता राजा' बघा झिम्मा खेळतो. 

झिम ‘कमळे’ झिम, खुर्चीभोवती झिम‘संजय’ मारतो नेम अन् ‘उद्धव’ करतो धूम‘दादा’च्या नादी लागून खुर्ची झाली गूमझिम ‘कमळे’ झिम, खुर्चीभोवती झिम

----------आम जनतेचे गाणे

एक लॉकडाऊन झेलू बाईदोन लॉकडाऊन झेलूदोन लॉकडाऊन झेलू बाईतीन लॉकडाऊन झेलूतीन लॉकडाऊन झेलू बाईचार लॉकडाऊन झेलूचार लॉकडाऊन झेलू बाई पाच लॉकडाऊन झेलू...-----------

अभय नरहर जोशी

  abhayjoshi27@gmail.com   (लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार