गुंडांना आधी निवडून आणू, नंतर सुधारू!

By Admin | Updated: February 11, 2017 01:56 IST2017-02-11T01:56:59+5:302017-02-11T01:56:59+5:30

गुंडांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचे काम करू, असे वादग्रस्त वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्याने सोशल मीडियातून देशमुख यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.

First select the goons, then improve! | गुंडांना आधी निवडून आणू, नंतर सुधारू!

गुंडांना आधी निवडून आणू, नंतर सुधारू!

मुंबई : गुंडांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचे काम करू, असे वादग्रस्त वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्याने सोशल मीडियातून देशमुख यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.
सोलापुरात पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री देशमुख यांनी, वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे, असे
वक्तव्य केले. शिवाय, ही सज्जन विरु द्ध दुर्जन
अशी महाभारताची लढाई असून यात सज्जनांचा
विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.
गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने विरोधक अगोदरच भाजपावर टीका करत असताना सुभाष देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्याने भाजप आणखीच टिकेचे लक्ष्य बनला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: First select the goons, then improve!