शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

सामाजिक बहीष्कार प्रतिबंध या नविन कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

By admin | Published: July 17, 2017 10:02 PM

जातीबाहय विवाह केला याची शिक्षा म्हणून पुणे तेलगु मडेलवार समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कृत केल्यामुळे एकाने पोलिसांकडे धाव घेतली असून

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 : जातीबाहय विवाह केला याची शिक्षा म्हणून पुणे तेलगु मडेलवार समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कृत केल्यामुळे एकाने पोलिसांकडे धाव घेतली असून, पंचायतीविरूद्ध त्याने केलेल्या तक्रारीनुसार 17 व्यक्तींवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध या नवीन कायद्याअंतर्गत हापहिलाच गुन्हा नोंदविण्यात आला आहे.उमेश चंद्रकांत रूद्राप ( वय 51 वर्षे रा. गल्ली नं 20 शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. आजच्या घडीला जो कोणी आंतरजातीय विवाह करीत असेल त्यांच्या लग्नाला पंचमंडळी उपस्थित राहात नाहीत. जे कोणी पदाधिकारी लग्नाला हजर राहातील त्यांना पदत्याग करण्यास भाग पाडले जाते. लग्न, सत्कार समारंभाला कुणी नातेवाईक गेल्यास त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार राजेंद्र नरसू म्हकाळे ( अध्यक्ष), सुनिल दत्तू कोंडगिर (उपाध्यक्ष), अनिल वरगंटे (सेक्रेटरी), श्रीधर बेलगुडे ( सहसेक्रेटरी), सुनिल वरगंटे ( खजिनदार), देवीदास वरगंटे ( सहखजिनदार), शिवन्ना आरमुर (मुख्यसंघटक) वसंतवरगंटे (सहसंघटक), लक्ष्मण बेलगुडे ( सहसंघटक), संजय येलपुरे ( सहसंघटक), तुळशीराम तेलाकल्लू, प्रेमचंद वडपेल्ली, सुभाष कंट्रोलू ( सल्लागार), नारायण इस्ट्रोलकर ( सल्लागार), मनिषा आसरकर आणि स्वरूपा अंबेप ( महिलाप्रतिनिधी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

आम्ही आणि आमच्या पालकांनी समाजातील ज्येष्ठ, उदारमतवादी सभासदांनी पंचायतीला आम्हाला वाळीत टाकू नका. आम्हाला जातीत लग्न करणा-या मुलांसारखे सभासद करून घ्या व नात्यानात्यातला वितुष्ठ, वितंडवाद संपवूनटाका अशी त्यांना विनंती केली, परंतु त्यांना जातीच्या रूढ परंपरेची पंचाच्या फतव्याची जास्त काळजी आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या आमच्यासारख्यांची सोईरीक पुन्हा जातीत होऊ नये याकरिता मुला/मुलींच्या पालकांना तोंडी आडमार्गाने सोयरिक न करण्याबददल धमकावले जाते. पंचाच्या या हट्टापायी काही पालकांनी मुला/मुलींचे लग्न त्यांच्या मनाविरूद्धलावून दिले परिणामस्वरूप त्यांचा संसार उध्वस्त झाला. आंतरजातीय विवाह करणे हा गुन्हा नाही. देशाच्या घटनेची व सर्वोच्च न्यायालयाची त्याला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रात आणि पुण्यात देखील जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून काहींनी आत्महत्या केली आहे. काहींनी आपले प्राण घेतले आहेत असे आमच्याबाबत काही घडू नये यासाठी पंचायतीला आम्हाला विनाअट आर्थिक दंड न आकारता सभासद करून घेण्यास भाग पाडावे यांनी नकार दिल्यास नवीन सामाजिक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जात पंचायत बंद पाडण्यास भाग पाडावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रूद्राप यांनी तक्रार अर्जात केली आहे.