पहिला सामना होणार : उर्वरित १९ सामन्यांचे भवितव्य टांगणीला

By Admin | Updated: April 8, 2016 02:21 IST2016-04-08T02:21:21+5:302016-04-08T02:21:21+5:30

राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा

The first match will be played: the fate of the remaining 19 matches will be suspended | पहिला सामना होणार : उर्वरित १९ सामन्यांचे भवितव्य टांगणीला

पहिला सामना होणार : उर्वरित १९ सामन्यांचे भवितव्य टांगणीला

मुंबई : राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्याला उच्च न्यायालायाने परवानगी दिली असली तरी उर्वरित १९ सामन्यांचा निर्णय १२ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
गुरुवारी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी खेळपट्टीसाठी वापण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. ‘खेळपट्ट्यांची देखभाल करण्यासाठी पाणी द्यायचे नसेल, तर बगिच्यांची देखभाल करण्यासाठीही पाणी देणे थांबविले पाहिजे,’ असे एमसीएच्या वकिलांनी म्हटले. या युक्तिवादावर खंडपीठाने संताप व्यक्त केला. राज्य सरकारने या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय नियोजन केले आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. आयपीएलला टँकरने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. (प्रतिनिधी)राज्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई असताना आयपीएलसाठी एवढे मोठे पाणी टँकरने कसे मिळणार? या टँकरना कोण पाणी देणार? हे प्रश्न राज्य सरकारला पडले नाहीत का? राज्य सरकारने स्वत:हून याची दखल घेऊन महापालिकेकडे आणि एमसीएकडे चौकशी करायला हवी होती, असे ताशेरे खंडपीठाने राज्य सरकारवर ओढले.खासगी विहिरी आणि बोअरवेल ताब्यात घेण्याचा विचार : आवश्यकता भासल्यास खासगी विहिरी आणि बोअरवेलही ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे. खंडपीठानेही राज्य सरकारला या विचाराबाबत अंतिम निर्णय काय असेल, याची माहिती १२ एप्रिल रोजी देण्याचे निर्देश दिले.

Web Title: The first match will be played: the fate of the remaining 19 matches will be suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.