मनसेची पहिली यादी सोमवारी -वेट अ‍ॅण्ड वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 14:00 IST2017-01-29T14:00:25+5:302017-01-29T14:00:25+5:30

महापालिकेतील सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या सोमवारी (दि. ३०) पहिली यादी घोषित केली जाणार आहे.

First list of MNS on Monday - Wet and watch | मनसेची पहिली यादी सोमवारी -वेट अ‍ॅण्ड वॉच

मनसेची पहिली यादी सोमवारी -वेट अ‍ॅण्ड वॉच

नाशिक : महापालिकेतील सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या सोमवारी (दि. ३०) पहिली यादी घोषित केली जाणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे. दरम्यान, इच्छुकांच्या मुलाखतींसंबंधीचा अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोपविण्यात आला असून, त्यांच्या मान्यतेनंतर यादी जाहीर केली जाणार आहे.
सत्ताधारी मनसेने गेल्या मंगळवारी व बुधवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मनसेकडे ४७३ अर्ज प्राप्त झाले होते, त्यानुसार दोन दिवस प्रभागनिहाय मुलाखती मनसेनेचे बाळा नांदगावकर, संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर, प्रदेश पदाधिकारी डॉ. प्रदीप पवार, राहुल ढिकले, महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, गटनेता अनिल मटाले यांनी घेतल्या होत्या. मनसेला मोठ्या प्रमाणावर गळती लागूनही मुलाखतीसाठी तरुणाईसह महिला वर्गाने गर्दी केली होती.

Web Title: First list of MNS on Monday - Wet and watch