The first list of eleven entrants is the ninth day | अकरावी प्रवेशाची पहिली यादी नव्वदीपार
अकरावी प्रवेशाची पहिली यादी नव्वदीपार

मुंबई : अकरावी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाली असून अपेक्षेप्रमाणे ती नव्वदीपार गेली. पहिल्या गुणवत्ता यादीत तब्ब्ल १ लाख ३४ हजार ४६७ विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या आहेत.


नामांकित महाविद्यालयांच्या कट आॅफवर नजर टाकली असता ज्या वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती दर्शविण्यात आली आहे, त्याच्या कट आॅफमध्ये यंदा १ ते २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कला शाखेच्या कट आॅफमध्ये फारसा फरक पडला नसला तरी विज्ञान शाखेचा कट आॅफ ४ ते ५ टक्क्यांनी खाली आला. त्यामुळे अकरावी प्रवेशोत्सुक नव्वदीपार विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होत आहे.


अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेले ४८ हजार ८७२ विद्यार्थी असून वाणिज्यच्या सर्वाधिक म्हणजे २३ हजार ३४९ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


सर्वाधिक जागा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना
पहिल्या गुणवत्ता यादीत १ लाख ३४ हजार ४६७ विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या असून त्यातील ८० हजार ४०२ जागा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना, १४ हजार १३१ जागा कला शाखेच्या, ३८ हजार ७१४ जागा विज्ञान शाखेच्या तर १ हजार २२० जागा एचसीव्हीसीच्या विद्यार्थ्यांना अलॉट झाल्या आहेत. यात राज्य मंडळाच्या १ लाख २२१ हजार ५५३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर सीबीएसईचे ४ हजार ६७९ आणि आयईसीएसी मंडळाचे ६ हजार ३१८ विद्यार्थी आहेत. एकूणच या पहिल्या यादीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या ही १२ हजार ९०४ इतकी आहे.


पहिल्या पसंतीक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश बंधनकारक
पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश जाहीर झाले आहेत, त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा ते या प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील, याची दखल घेण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालकांनी केले आहे. यानंतर त्यांचा विशेष फेरीत समावेश केला जाईल. तसेच प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १३ ते १६ जुलैदरम्यान (रविवार वगळून) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करावे लागतील. इनहाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी यापुढील कोणत्याही फेरीसाठी पात्र नसतील.


पहिल्या फेरीत एसईबीसीच्या ३,२८७ विद्यार्थ्यांना जागा अलॉट
च्मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर या वर्गातील विद्यार्थी आरक्षणाशिवाय राहू नयेत यासाठी अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले होते.
च्पहिल्या यादीसाठी एसईबीसीच्या ४,७२६ विद्यार्थ्यांनी या प्रवर्गातून अर्ज केला होता. यामधील ३,२८७ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे.
च्ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५९७ आहे. खुल्या प्रवर्गातून प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३ हजार २९३ इतकी आहे.


Web Title: The first list of eleven entrants is the ninth day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.