लोकशाही आघाडीची पहिली यादी जाहीर
By Admin | Updated: September 21, 2014 02:02 IST2014-09-21T02:02:52+5:302014-09-21T02:02:52+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या 40 उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर करण्यात आली.

लोकशाही आघाडीची पहिली यादी जाहीर
अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या 40 उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र लोकशाही आघाडीमध्ये भारिप-बहुजन महासंघ, लाल निशाण, सोशालिस्ट फोरम, लोकभारती, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया आदी घटक पक्षांचा समावेश आहे. शनिवारी लोकशाही आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, विजय कुलकर्णी, मिलिंद रानडे, देवेंद्र गुजर, कपिल पाटील व शब्बीर अन्सारी यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली.
16 मतदारसंघात मित्रपक्षांना पाठिंबा!
महाराष्ट्र लोकशाही आघाडीने 16 मतदारसंघात मित्र पक्षांना पाठिंबा जाहीर केला. त्यामध्ये अलिबाग, पनवेल, पेण, सांगोला, तुळजापूर, उरण या 6 मतदारसंघात शेकापला आणि डहाणू, विक्रमगड, पालघर, भोईसर, सोलापूर मध्य, नाशिक पश्चिम, भांडूप पश्चिम इत्यादी 7 मतदारसंघात सीपीएमला आणि औरंगाबाद पूर्व, आरमोरी व अमळनेर इत्यादी 3 मतदारंसघात सीपीआयला पाठिंबा राहणार आहे. (प्रतिनिधी)