काँग्रेसची पहिली यादी पाच दिवसांत - ठाकरे

By Admin | Updated: September 14, 2014 01:53 IST2014-09-14T01:53:55+5:302014-09-14T01:53:55+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी 18 सप्टेंबर्पयत जाहीर केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पत्रकारांना सांगितले.

First list of Congress in five days - Thackeray | काँग्रेसची पहिली यादी पाच दिवसांत - ठाकरे

काँग्रेसची पहिली यादी पाच दिवसांत - ठाकरे

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी 18 सप्टेंबर्पयत जाहीर केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, नवे चेहरे आणि महिलांना योग्य स्थान यादीमध्ये देण्याचा आमचा प्रय} असेल. राष्ट्रवादी काँग्रेसशी काँग्रेसची जागावाटपाची बोलणी येत्या दोन दिवसांत दिल्लीमध्ये होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या राज्यव्यापी प्रचाराचा प्रारंभ मुंबईत आधीच झाला आहे. आता विभागीय पातळीवर प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यासाठी 18 सप्टेंबरपासून सभा होणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणो आदी नेते मार्गदर्शन करतील. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: First list of Congress in five days - Thackeray