शिवसेनेची 19 जणांची पहिली यादी जाहीर

By admin | Published: February 2, 2017 09:56 AM2017-02-02T09:56:00+5:302017-02-02T10:08:29+5:30

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने 19 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विद्यमान आणि माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.

The first list of 19 people released by Shiv Sena | शिवसेनेची 19 जणांची पहिली यादी जाहीर

शिवसेनेची 19 जणांची पहिली यादी जाहीर

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 2 - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने 19 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विद्यमान आणि माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर हे सर्व उमेदवार आजच भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
बुधवारी रात्री उशीरा शिवसेनेने 150 एबी फॉर्मचे वाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विभागप्रमुखांच्या माध्यमातून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुंबई मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस राहिले असून आतापर्यंत केवळ 166 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
 
 
महापालिका निवडणुकांच्या तारखा
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.  महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होतील.  तर 25 जिल्हा परिषदा आणि 296 पंचायत समितींची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. मतमोजणी 23फेब्रुवारीला होणार आहे.
 

Web Title: The first list of 19 people released by Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.