सी प्लेनचे पहिले उड्डाण
By Admin | Updated: August 26, 2014 04:37 IST2014-08-26T04:37:06+5:302014-08-26T04:37:06+5:30
समुद्रातून उड्डाण करणारे आणि समुद्रात उतरणाऱ्या पहिल्या सी-प्लेनचे उड्डाण सोमवारी जुहू येथून झाले. मुंबई ते पवना डॅमचा (लोणावळा) प्रवास अवघ्या अर्ध्या तासांत होणार आहे.

सी प्लेनचे पहिले उड्डाण
मुंबई : समुद्रातून उड्डाण करणारे आणि समुद्रात उतरणाऱ्या पहिल्या सी-प्लेनचे उड्डाण सोमवारी जुहू येथून झाले. मुंबई ते पवना डॅमचा (लोणावळा) प्रवास अवघ्या अर्ध्या तासांत होणार आहे. यासाठी एका प्रवाशाला २,९९९ रुपये प्रवाशांना मोजावे लागतील.. मेहेर व एमटीडीसीच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा सुरु करण्यात आली असून येत्या काही महिन्यात शनिशिंगणापूर, गणपतीपुळे आणि वाई येथेही ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.
2013च्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेहेर आणि एमटीडीसीच्या संयुक्त विद्यमाने सी-प्लेन सेवेचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रथम जुहू ते अॅम्बी व्हॅली ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेत त्यानंतर जुहू ते गिरगाव, जुहू ते नाशिक, जुहू ते गणपतीपुळे व जुहू ते वाई (महाबळेश्वर) अशी सेवा सुरू केली जाणार होती.
सी-प्लेन सोमवारी उद्घाटनाच्या प्रसंगी तब्बल दीड तास लेट धावले. अन्य विमाने धावत असल्याने या पहिल्या सी-प्लेनला हवाईमार्ग मोकळा मिळू शकला नाही आणि त्याचाच फटका बसल्याचे सांगण्यात आले. मार्ग मोकळा मिळताच साडे दहा वाजता सुटणारे सी-प्लेन अखेर बारा वाजता उडाले.