शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग; 'एमआयडीसी' उभारणार तब्बल 2 हजार एकरमध्ये 'लेकसिटी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 14:38 IST

औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन लेक सिटीची निर्मिती एमआयडीसीच्या तळेगाव टप्पा चारमध्ये 6 हजार एकर मध्ये 60 व 40 प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व रहिवास क्षेत्रचा विकास करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देतळेगाव टप्पा चार मध्ये रहिवाशी क्षेत्र राखीव

सुषमा नेहरकर-शिंदे  पुणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ( एमआयडीसी) च्या मावळ तालुक्यातील तळेगाव टप्पा चार मध्ये महामंडळाच्या वतीने तब्बल 2 हजार एकर पेक्षा अधिक जागेत आंध्र धरणाच्या बॅकवॉटर लगत आंतरराष्ट्रीय दर्जाची लेक सिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागविण्यात आल्या आहेत. यामुळे एखाद्या एमआयडीसी क्षेत्रात औद्योगिक विकासासोबतच अशा प्रकारी लेकसिटीची निर्मिती हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. 

मावळ तालुक्यातील तळेगाव टप्पा चार मध्ये एमआयडीसी साठी तब्बल 6 हजार एकरचे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या टप्पा चार साठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. देशात बंगलोर नंतर महाराष्ट्रात प्रथमच तळेगाव टप्पा चार मध्ये हार्डवेअरची इंडस्ट्रीज उभी राहात आहे. तळेगाव टप्पा चार मधील 6 हजार एकर मध्ये पूर्णपणे प्रदुषण विरहित (नाॅन.... ) इंडस्ट्रीज उभारण्यात येणार आहेत. यात सर्वाधिक भाग हा हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्याचा असणार आहे. या औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन कामाच्या ठिकाणीची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रहिवास सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ही लेकसिटी उभारण्यात येणार आहे. 

आंध्र धरणालगतच्या प्रचंड निसर्गरम्य परिसर तब्बल दोन हजार एकर पेक्षा अधिक जागेत ही लेकसिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी तळेगाव टप्प्या चार मधील निगडे, पवळेवाडी, आंबळे आणि कल्हाट या गावातील गावठाण सोडून शिल्लक जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या लेकसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या युनिव्हर्सिटी पासून गोल्फ क्लब,  हाॅस्पिटलसपासून सर्व प्रकारच्या हायक्लास डेव्हलपमेंट करण्यात येणार आहेत. यासाठी एमआयडीसीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे पुण्यात सहारा सिटी, लवासा सिटी नंतर आणखी एक लेक सिटी उभे राहणार आहे. -------औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन लेक सिटीची निर्मिती एमआयडीसीच्या तळेगाव टप्पा चारमध्ये 6 हजार एकर मध्ये 60 व 40 प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व रहिवास क्षेत्रचा विकास करण्यात येणार आहे. यामुळेच तब्बल 2 हजार एकर मध्ये ही लेक सिटी उभारण्यात येणार आहे. यात सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. यासाठी एमआयडीसीने आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागविण्यात आल्या आहेत. - अविनाश हदगल, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी --------अशी असेल ही लेकसिटी - एमआयडीसीचा राज्यातील पहिला प्रयोग - सहा हजार एकर पैकी 2 हजार एकर रहिवास क्षेत्रासाठी राखीव - आंध्र धरणालगत अत्यंत निसर्गरम्य परिसरात लेकसिटी- लेकसिटीत गोल्फ क्लब पासून आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी, हाॅस्पिटलस् - लेक सिटीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निविदा - पुणे- मुंबई शहराल कनेक्ट असलेली सिटी- प्रथम औद्योगिक क्षेत्राचा विकास नंतर लेकसिटीची डेव्हलपमेंट - औद्योगिक क्षेत्रात शंभर टक्के नाॅन पोल्यूटेड कंपन्या

टॅग्स :PuneपुणेTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसMIDCएमआयडीसी