नोटाबंदीनंतर वर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त ५७ दस्तनोंदणी

By Admin | Updated: January 1, 2017 18:41 IST2017-01-01T18:41:14+5:302017-01-01T18:41:14+5:30

खामगाव येथे कोणत्याही खरेदी व्यवहारासाठी शुभमुहूर्त अथवा आठवड्यातील दिवसाचे मुहूर्त ठरविले जातात.

On the first day of the year after the anniversary, only 57 documentaries | नोटाबंदीनंतर वर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त ५७ दस्तनोंदणी

नोटाबंदीनंतर वर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त ५७ दस्तनोंदणी

ऑनलाइन लोकमत/गिरीश राऊत
बुलडाणा, दि. 1 - खामगाव येथे कोणत्याही खरेदी व्यवहारासाठी शुभमुहूर्त अथवा आठवड्यातील दिवसाचे मुहूर्त ठरविले जातात. याच मानसिकतेतून गतवर्षी राज्यात नवीन वर्ष २०१६च्या प्रारंभी १ जानेवारीला तब्बल ४ हजारांचे वर दस्त नोंदणी झाली होती. मात्र यावर्षी नोटबंदीचा परिणाम की काय ही संख्या हजारावरून घसरत शेकडासुद्धा गाठू शकली नाही. यावर्षी नववर्षाचे पहिल्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत फक्त ५७ दस्तऐवजांचीच नोंदणी झाली आहे. शेत, प्लॉट, घर, अशा स्थावर मालमत्तांची खरेदी शासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या महसूल व नोंदणी विभाग अंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत वा आॅनलाइन पद्धतीने केली जाते. राज्याच्या महसुलात भर घालणारा हा महत्त्वाचा विभाग समजला जातो. सन २०१६ आधीची दोन वर्ष दुष्काळाचे असल्याने स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार मंदावले होते. मात्र सन २०१६ मध्ये स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ झाली होती. गत वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०१६ या प्रथम दिवशी राज्यात असणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयात तसेच आॅनलाइन पद्धतीने दुपारी ४.१५ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ५२ एवढी दस्त नोंदणी झाली होती. मात्र यावर्षी हा आकडा घसरून केवळ ५७ वर आला आहे. यावर्षीच्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०१७ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत फक्त ५७ दस्तऐवजांची नोंदणी झाली आहे.

दस्त नोंदणीचा आकडा पहिल्या वर्षीच्या तुलनेत घसरल्याने प्राप्त महसुलाचा आकडासुद्धा घसरला आहे. १ जानेवारी २०१७ रोजी दस्तनोंदणी केवळ ५७ झाली असल्याने यापासून फक्त ५० लाख रुपये महसूल शासनाला मिळाला. तर गतवर्षी १ जानेवारीला झालेल्या व्यवहारापासून शासनाला २३.९३ कोटी रुपये महसूल मिळाला होता.

Web Title: On the first day of the year after the anniversary, only 57 documentaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.