शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १३व्या मिनिटाला संपले कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 2:43 AM

विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अगदी १३व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज संपले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्यांवर विरोधकांचा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत उतरून घोषणाबाजीला सुरूवात केली. मात्र, या गदारोळातच सभापतींनी पुढील कामकाज पुकारले. विरोधकांच्या गदारोळात अवघ्या १३ व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज उरकले गेले.वंदे मातरमने दुपारी बारा वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याची सूचना दिली होती. महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन मांडण्याचा प्रयत्न केला. यावर, शिवसेना सदस्य दिवाकर रावते यांनी हरकत घेतली. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. यापूर्वी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतरच स्थगन प्रस्ताव घेण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासानंतरच स्थगनच्या सूचना घ्याव्यात, अशी मागणी केली. तर, गेली पाच वर्ष आम्ही सुद्धा हीच मागणी करत होतो. मात्र, एका स्थगनवर चारचार सदस्य भाषणे ठोकत होते. त्या पाच वर्षात शिवाजीराव देशमुख यांच्या आदेशाचे पालन झालेले नाही. आता हीच नवी प्रथा बनली आहे. आम्ही विरोधात आलो म्हणून लगेच प्रथा बदलू नये, अशी मागणी भाजप सदस्य भाई गिरकर यांनी केली. यावर अनेक आदेशांचे पालन झाल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. काही बाबी होऊ शकल्या नसतील तर त्या तशाच चालू ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका मांडत सभापतींनी स्थगन प्रस्तावाच्या सूचना फेटाळून लावल्या.संतप्त विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. या गदारोळातच २०१९-२० च्या पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्र सभागृहासमोर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच कार्यक्रम पत्रिकेवरील सर्व कामकाज पुकारले गेले. अवघ्या १३ व्या मिनिटाला सर्व नियोजित कामकाज गदारोळात पूर्ण झाले. सभापतींनी दिवसभराचे कामकाज संपल्याची घोषणा केली.तालिका सभापतींची निवडसभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी तालिका सभापती म्हणून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, भाजपचे अनिल सोले, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची निवड केली.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद