शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

पहिल्या मुक्कामस्थळाचा विकास आवश्यक

By admin | Updated: June 10, 2017 01:52 IST

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत श्रीक्षेत्र देहूगावचा विकास होत असतानाच जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत श्रीक्षेत्र देहूगावचा विकास होत असतानाच जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या पहिल्या मुक्कामाचे स्थळ इनामदारवाडा व वाड्यालगतच्या श्री संत तुकाराममहाराज जन्मस्थानाच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन तातडीने विकास हाती घ्यावा, अशी मागणी संस्थानाच्या विश्वस्त व ग्रामस्थांची आहे. मात्र, या पालखीतळाच्या विकासात जागेची उपलब्धता मोठा अडसर असल्याचे समोर आले आहे. काही जागामालक जन्मस्थानाचा विकासासाठी जागा देण्यास तयार आहेत. उर्वरित लोकांशी चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो. याबाबत शासनानेच तोडगा काढून या पालखीतळाचा व जन्मस्थानाचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.श्री संत तुकाराममहाराज व श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला श्री संत तुकाराम महाराजांचे पूत्र व पालखी सोहळ्याचे जनक नारायणमहाराज यांनी सुमारे ३३१ वर्षांपूर्वी म्हणजे इ. स. १६८६ मध्ये पालखी सोहळ्याला सुरुवात केली. हा सोहळा प्रथम अत्यंत कमी लोकांसह पंढरपूरकडे जात होता. कालांतराने पालखी सोहळ्याला राजाश्रय मिळाला आणि पालखी सोहळ्याचे स्वरूप हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली. पालखीसोहळा सुरू झाल्यापासून पालखीचा पहिला मुक्काम हा नारायणमहाराजांच्या घरी म्हणजे इनामदारवाडा येथे असायचा. त्यानंतर हा पालखी सोहळा आळंदीमार्गे पंढरपूरकडे रवाना होत असे. सध्या पालखीसोहळा पारंपरिक पद्धतीने होत असला, तरी त्याचे स्वरूप काहीसे बदललेले पहावयास मिळते. पालखी प्रस्थानापूर्वी येथील मानकरी घोडेकर कुटुंबीय महाराजांच्या चांदीच्या पादुकांना चकाकी देऊन इनामदारवाड्यात विधिवत आणतात. तेथे त्यांची पूजा होते व तेथून मानकरी व सेवेकरी गंगामसल्याचे मसलेकर या पादुका डोक्यावर घेऊन मुख्य मंदिरात येतात. तेथे पादुकांची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर पालखी प्रस्थान होत असते. काही वर्षांपूर्वी मांढरदेवी यात्रेत झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या वर्षी थेट धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीसदेखील उपाययोजना करणार आहेत. त्यातून पोलीस व स्थानिक यांच्यात वाद होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. वाड्याच्या अंतर्गत भागात पालखीला लागणारी जागा, भजन-कीर्तन करणारे लोक व जागरणासाठी उपस्थित भाविकांना बसण्याची फारशी जागा उपलब्ध असत नाही. पाऊस पडत असेल, तर अत्यंत बिकट अवस्था होते. या अडचणींवर मात करण्यासाठी येथील जागेचा व जन्मस्थानाचा विकास करावा, अशी येथील नागरिकांसह संस्थानच्या विश्वस्तांची मागणी आहे. मात्र, अद्यापही याचा गांभीर्याने विचार झालेला दिसत नाही. इनामदारवाड्याच्या एका बाजूला श्री संत तुकाराममहाराजांचे जन्मस्थान व एका बाजूला विठ्ठल-रुक्मिणीचे मुख्य मंदिर आहे. गेल्या चार वर्षांपासून देहूमध्ये शासन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामे करीत आहे. या माध्यमातून इंद्रायणी नदीचा घाट, अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या व भूमिगत गटारे, विद्युतीकरण, रस्ते,भक्त निवास व अन्नछत्र, सार्वजनिक शौचालये, पूल, स्मशानभूमी यांचा विकास झाला आहे. अद्यापही काही कामे शिल्लक असून, ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील.चिंचोलीतील पहिल्या विसाव्याची दुरवस्थालोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या चिंचोली येथील पादुका मंदिर या पहिल्या विसाव्याच्या परिसरात ठेकेदाराने इंटरनेट केबलसाठी दोन महिन्यांपूर्वी खोदलेले मोठे चर अद्यापही बुजविले नाहीत. त्यामुळे पायी वारीतील वारकऱ्यांची विसाव्याला मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. खोदलेल्या लांबलचक चरामुळे चिंचोली, किन्हई, कान्हेवाडी व पंचक्रोशीतून पालखी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही गैरसोय होणार असून, चरात पडून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संत तुकाराममहाराज पालखीचे १६जूनला देहूगावातून प्रस्थान होणार आहे. दुसऱ्या दिवशी देहूगावातून निघाल्यानंतर दुपारचा पहिला विसावा दर वर्षी चिंचोलीत शनि मंदिर व पादुका मंदिर येथे असतो. या ठिकाणी मोठे रिकामे माळ मोकळे असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होत नाही. येथे सोहळ्यातील वारकरी व भाविक दुपारचे भोजन घेत असतात. चिंचोली व किन्हईचे ग्रामस्थ वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करीत असतात. विविध लष्करी आस्थापनांच्या वतीने फराळ व नित्योपयोगी वस्तूंच्या वाटपासाठी स्वागत कक्ष उभारण्यात येत असतात. सोहळा या ठिकाणी दोन तास थांबत असल्याने काही भाविक भोजन झाल्यावर येथील माळरानावर आराम करतात. मात्र, परिसरात खोदलेल्या मोठ्या चरांनी जागा व्यापली असून, काही ठिकाणी चर बुजविले नसल्याने अपघाताचा धोका आहे. वारकऱ्यांच्या भोजन व विसाव्यासाठीच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात वादळी पावसात किन्हई फाट्यालगत दोन बाभळीची झाडे उन्मळून पडलेली आहेत. विसावा परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. चर बुजविण्यासाठी संबंधितांना सूचना देण्याबाबतची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भेगडे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे.