‘नीट’मध्ये हेत शहा देशातून पहिला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 04:51 IST2016-08-17T04:51:47+5:302016-08-17T04:51:47+5:30
सेंट्रल बोर्ड आॅफ सेकेंडरी एज्युकेशनने घेतलेल्या ‘नीट’(नॅशनल एलिजेबिलिटी कम इंट्रन्स टेस्ट) परीक्षेचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर झाला

‘नीट’मध्ये हेत शहा देशातून पहिला!
मुंबई : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकेंडरी एज्युकेशनने घेतलेल्या ‘नीट’(नॅशनल एलिजेबिलिटी कम इंट्रन्स टेस्ट) परीक्षेचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर झाला. या परीक्षेसाठी देशातून ७ लाख ३१ हजार २२३ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी ४ लाख ९ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हेत शाह हा विद्यार्थी देशातून पहिला आला आहे. एकांश गोयल आणि निखिल बाजीया यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदवी प्रवेशासाठी नीट-यूजी घेण्यात आली होती. १ मे आणि २४ जुलै अशा दोन टप्प्यांत पार पडलेल्या या परीक्षेसाठी एकूण ८ लाख २ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी ७ लाख ३१ हजार २२३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. मात्र, त्यांपैकी केवळ ४ लाख ९ हजार ४७७ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींची संख्या अधिक आहे. १ लाख ८३ हजार ४२४ मुले आणि २ लाख २६ हजार ४९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. (प्रतिनिधी)