शहरं
Join us  
Trending Stories
1
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
2
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
3
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
4
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
5
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
6
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
7
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
8
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
9
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
10
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
11
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
12
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
13
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
14
WPL 2026: Mumbai Indiansच्या सामन्यात दिसली Anaya Bangarची 'ग्लॅमरस' झलक, फोटोंचीही चर्चा
15
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
16
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
17
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
18
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
19
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
20
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी स्थापल्या कंपन्या

By admin | Updated: January 5, 2015 00:51 IST

कंपनी म्हटले की, डोळ्यापुढे उभा राहतो गर्भश्रीमंत वर्ग. आजपर्यंत याच वर्गाची कंपनी स्थापनेत मक्तेदारी राहिली. मात्र आता प्रक्रिया उद्योगासाठी शेतकरी पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतीशी

शेतीला उद्योजकतेची जोड : दुष्काळी परिस्थितीत बदलाचे वारेरूपेश उत्तरवार - यवतमाळ कंपनी म्हटले की, डोळ्यापुढे उभा राहतो गर्भश्रीमंत वर्ग. आजपर्यंत याच वर्गाची कंपनी स्थापनेत मक्तेदारी राहिली. मात्र आता प्रक्रिया उद्योगासाठी शेतकरी पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतीशी निगडित प्रक्रिया उद्योग करणाऱ्या २४ कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत हे बदलाचे वारे निश्चितच आशादायी आहेत. शेतकरीच कंपनीचा मालक होणार असल्याने इतर शेतकऱ्यांची फसवणूक टाळल्या जाण्याची आशा आहे.यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. निसर्गाशी दोन हात करीत आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत बदल घडविण्याच्या उमेदाने काही शेतकरी पुढे आले. त्यांनी शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी चक्क कंपनीचीच स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून साठवणूक, प्रक्रिया आणि वितरणाचे काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कंपनी स्थापन केली त्या ठिकाणावरून व्यापारी स्वत: माल उचलणार आहे. त्यामुळे प्रक्रिया झालेल्या शेतमालास अधिक दर मिळेल, त्यातून अडते, मापारी आपसूकच बाद होतील. शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल. यवतमाळ जिल्ह्यात स्थापन झालेल्या २४ कंपन्यांमध्ये तूर डाळ तयार करणे, बाजारात विक्रीस जाणारे सोयाबीन, गहू स्वच्छ करणे, उडीद, मूग, चणा दाळ यावर प्रक्रिया करून ती बाजारात पाठविणे तसेच जिल्ह्यातील नैसर्गिक गूळ पॅकिंग करून बाजारात येणार आहे. थेट मार्केटिंग हातात घेतानाच गहू, ज्वारी, बाजरी यावर देखील प्रक्रिया केली जाईल. एवढेच नाही तर फळ आणि भाज्यादेखील पॅकिंग स्वरूपात बाजारात आणण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आणि आत्माने सहकार्य केले आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी २० लाखापर्यंत अनुदान दिले जाते. अशा आहेत शेतकरी कृषी उद्योगाधारित कंपन्याकृषी समृध्दी ट्रेडिंग कंपनी, कळंब, भूमिपुत्र सेल्फ रिलायंट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, कळंब, संघर्ष अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी, राळेगाव, मंथन अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी, घाटंजी, नवजीवन अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी, घाटंजी, यशोधरा प्रोड्युसर कंपनी घाटंजी, पैनगंगा अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी, आर्णी, त्रिमूर्ती फार्मस प्रोड्युसर कंपनी, आर्णी, बळीराजा प्रोड्युसर कंपनी, बाभुळगाव, नवयुवक शेतकरी प्रोड्युसर कंपनी, वणी, बळीराजा प्रोड्युसर कंपनी, दिग्रस, तुळजाई अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी, हिवरी संगम, उमरखेड तालुका शेतकरी उत्पादक कंपनी, अन्नपूर्णेश्वर प्रोड्युसर कंपनी, पन्हाळा, शेतकरी उत्पादक संघ, बोरगडी, दुधगिरी महाराज शेतकरी उत्पादक संघ, पुसद, भूमिपुत्र शेतकरी उत्पादक संघ, मुकुटबन, नवनिर्माण शेतकरी उत्पादक संघ, मुकुटबन, आप्पास्वामी शेतकरी उत्पादक संघ, पिंपळनेर, वसंतराव नाईक शेतकरी उत्पादक संघ, हुडी, सुधाकरराव नाईक उत्पादक संघ, हिवळणी, एकवीरा शेतकरी उत्पादक संघ, हिवरा, बळीराजा शेतकरी उत्पादक संघ, वसंतपूर.