आकुर्डीमध्ये तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने वार
By Admin | Updated: July 24, 2016 00:18 IST2016-07-24T00:18:52+5:302016-07-24T00:18:52+5:30
पुर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करीत कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील इंडसलँड बँकेजवळ घडली. दोन दिवसांपुर्वी

आकुर्डीमध्ये तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने वार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.२४ - पुर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करीत कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील इंडसलँड बँकेजवळ घडली. दोन दिवसांपुर्वी एका गटाशी झालेल्या भांडणामधून हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अमित चव्हाण (रा. चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण याची दोन दिवसांपुर्वी काही तरुणांशी भांडणे झाली होती. चव्हाण शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ आला असताना त्याच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी हल्ला केला. त्याच्यावर सुरुवातीला कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर पिस्तूलामधून गोळी झाडण्यात आली. मात्र, ही गोळी त्याला लागली नाही. घटनास्थळावर पोलिसांनी पुंगळी मिळाली असून आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना झाली आहेत. चव्हाणवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.