शिवसेनेच्या नगर शहरप्रमुखावर गोळीबार
By Admin | Updated: September 2, 2015 00:59 IST2015-09-02T00:59:08+5:302015-09-02T00:59:08+5:30
शिवसेनेचे शहरप्रमुख भरत मोरे व साजीद पठाण यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी गोळीबार केला़ सुदैवाने हल्ल्यात दोघेही बचावले़

शिवसेनेच्या नगर शहरप्रमुखावर गोळीबार
कोपरगाव (अहमदनगर) : शिवसेनेचे शहरप्रमुख भरत मोरे व साजीद पठाण यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी गोळीबार केला़ सुदैवाने हल्ल्यात दोघेही बचावले़ मोरे यांनी वाळूतस्करांनी गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मोरे यांनी कोपरगावमधील वाळूची अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती़ सोमवारी रात्री मोरे व पठाण नगर-मनमाड रस्त्यावरील एका हॉटेलमधून जेवण करून कोपरगावकडे येत होते़ टाकळी नाक्यावर दोन मोटारसायकलवरून चार जण अचानक समोर आले़ एकाने लाकडी दांडका काचेवर मारला तर दुसऱ्याने बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या़ सुदैवाने त्यातील गोळी त्यांना लागली नाही. घटनेनंतर त्यांच्या कारला झालेल्या अपघातात मोरे व पठाण किरकोळ जखमी झाले. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर वेगवेगळ्या दिशेने पळून गेले़ गोळीबाराप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी दिली. (प्रतिनिधी)