वणी येथे सुरक्षाकडून हवेत गोळीबार, ६ जखमी
By Admin | Updated: October 11, 2016 13:30 IST2016-10-11T13:30:08+5:302016-10-11T13:30:08+5:30
नाशिक जिल्ह्यात वणी इथं दसऱ्याच्या कार्यक्रमाच्या वेळी एका सुरक्षाकडून हवेत गोळीबार करताना चुकून बंदूक निसटल्याने बंदुकीतील छर्रे अन्य भाविकांना लागले व ६ जण जखमी झाले.

वणी येथे सुरक्षाकडून हवेत गोळीबार, ६ जखमी
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ११ - नाशिक जिल्ह्यात वणी इथं दसऱ्याच्या कार्यक्रमाच्या वेळी एका सुरक्षाकडून हवेत गोळीबार करताना चुकून बंदूक निसटल्याने बंदुकीतील छर्रे अन्य भाविकांना लागल्याने सहाजण जखमी झाले. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला . दसऱ्याच्या दिवशी गडावर दसरा टप्पा हा कार्यक्रम असतो. बोकड बळी देतांना सुरक्षा रक्षक छर्र्याच्या बंदुकीतून हवेत गोळीबार करतात आज सकाळी असाच कार्यक्रम सुरु असतांना चव्हाण नामक सुरक्षा रक्षकाकडून हवेत गोळीबार सुरु असताना बंदूक हातातून निसटली. आणि त्याच वेळी छर्रे उडून सहा जणांच्या पायात घुसले. या प्रकारानंतर जखमींना कळवण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.