गॅलेक्सी हॉटेलच्या मॅनेजरवर पुजारी टोळीकडून खंडणीसाठी गोळीबार

By Admin | Updated: May 8, 2017 04:31 IST2017-05-08T04:31:56+5:302017-05-08T04:31:56+5:30

रविवारी दुपारी हॉटेल गॅलेक्सीच्या मॅनेजरवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सुरेश पुजारीच्या

Firing for ransom from priest gang on manager of the Galaxy Hotel | गॅलेक्सी हॉटेलच्या मॅनेजरवर पुजारी टोळीकडून खंडणीसाठी गोळीबार

गॅलेक्सी हॉटेलच्या मॅनेजरवर पुजारी टोळीकडून खंडणीसाठी गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : रविवारी दुपारी हॉटेल गॅलेक्सीच्या मॅनेजरवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सुरेश पुजारीच्या नावाची चिठ्ठी टाकून हल्लेखोर फरार झाले.
रविवारी दुपारी एकच्या सुमारास मोटारसायकलवरून दोन अज्ञात तरुण काउंटरवर आले. त्यांनी मॅनेजर दीपक वर्मा यांच्याकडे मालक शशीधर शेट्टी यांच्याबद्दल विचारणा केली. ते नाहीत, असे सांगताच त्यातील एका तरुणाने पिस्तुलातून मॅनेजरवर गोळी झाडली व ते फरार झाले. त्यांनी सुरेश पुजारी असे लिहिलेली चिठ्ठी टाकली. वर्मा यांच्यावर मीरा रोड येथील
वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. शशीधर शेट्टी यांच्याकडे गेल्या वर्षी पुजारी
यांने २५ लाखांची खंडणी मागितली होती. नालासोपारा पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला
आहे.

Web Title: Firing for ransom from priest gang on manager of the Galaxy Hotel