शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण आंदोलनाचे दिवाळीनंतर फुटणार फटाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 05:44 IST

सरकारला घेरण्यासाठी विविध गटांची घोषणा; २ नोव्हेंबरच्या उपोषणाने सुरुवात

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाने सरकारला घेरण्यासाठी विविध आंदोलनांची घोषणा केली आहे. २ नोव्हेंबरला आझाद मैदानात काळ्या फिती आणि काळे झेंडे घेऊन बेमुदत उपोषणाने आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर १५ नोव्हेंबरनंतर आदोलनाचे स्वरूप तीव्र होईल, अशी माहिती सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वय प्रा. संभाजी पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबरची मुदत मागितली होती. त्यामुळे आरक्षण प्रश्नावर १५ नोव्हेंबरनंतरच आंदोलनाला सुरुवात होईल. मात्र आरक्षणप्रश्नी पुकारलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान ज्या मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यासह सारथी संस्थेचा कारभार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह यांसह विविध मागण्यांवर अद्याप अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांकडून यासंदर्भात मराठा समाजाची दिशाभूल होत आहे. छत्रपती संभाजी राजे यांना खासदारकी, नरेंद्र पाटील यांना महामंडळ आणि सदानंद मोरे यांना सारथी संस्थेचे लाभाचे पद देऊन सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या प्रलोभनांचा समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट दिवाळीनंतर आंदोलन अधिक आक्रमक होईल.सरकारने उपोषणाची दखल न घेतल्यास १६ नोव्हेंबरपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते जनावरे घेऊन मंत्रालय आणि ‘वर्षा’वर धडकतील. सर्व आंदोलने अहिंसेच्या मार्गाने होणार असून आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे समन्वयकांनी स्पष्ट केले. सकल मराठा क्रांती ठोक मोर्चानेही २० नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसण्याची घोषणा केली आहे.तर २१ नोव्हेंबरपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पक्षाला पाठिंबा नाही‘मराठा क्रांती मोर्चा’ नावाने पक्ष स्थापना करणाऱ्यांना पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण सकल मराठा क्रांती मोर्चाने दिले आहे. मराठा क्रांती मोर्चाची स्थापना मराठा भगिनीवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि मराठा आरक्षणासाठी झाली आहे. तो उद्देश पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारवर दबावतंत्र म्हणून समाज एकवटला आहे. त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ शकत नाही. परिणामी, अशा कोणत्याही पक्षाला समाज पाठिंबा देणार नसल्याचे मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा