कापसाच्या कारखान्याला भीषण आग ; ४० लाखाचे नुकसान

By Admin | Updated: March 7, 2017 18:17 IST2017-03-07T18:09:58+5:302017-03-07T18:17:39+5:30

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 7 :सोलापूरातील अक्कलकोट रोड येथील श्री गणेश एंटरप्रायझेस या कापसाच्या कारखान्याला आग लागली. आग इतकी ...

The fires of cotton factory; 40 Lakhs Damage | कापसाच्या कारखान्याला भीषण आग ; ४० लाखाचे नुकसान

कापसाच्या कारखान्याला भीषण आग ; ४० लाखाचे नुकसान

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 7 :सोलापूरातील अक्कलकोट रोड येथील श्री गणेश एंटरप्रायझेस या कापसाच्या कारखान्याला आग लागली. आग इतकी भीषण होती की चार अग्निशामक दलाच्या बंबानेही ती आटोक्यात आली नाही. आग विजवण्यासाठी खाजगी पाण्याचे टँकर मागविण्यात आले. या आगीत कारखान्याचे सुमारे त्यात सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जिवित हाणी झाली नाही. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी ३:३० च्या सुमारास घडली.

कारखान्याचे संचालक विजय सातपूते म्हणाले की, कारखान्यामध्ये खराब कापूस व चर्चापानावर कचरा चिंद्या जमा करुन त्या पिंजल्या जातात व स्वछ केलेला कापूस मशिनरी पुसण्यासाठी विकला जातो. आज दुपारी सुमारे दहा कामगार आत कापूस पिंजण्याचे काम मशिनवर करत असताना अचानक मशिनमधील कापसाला आग लागली. उन्हाळ्यामुळे कारखान्यातील कापूस व मशिनरीही तापल्या असल्याने आगीने काही मिनिटात रौद्र रुप घेतले. अग्निशामक कडून चार बंबाव्दारे आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

https://www.dailymotion.com/video/x84cslj

Web Title: The fires of cotton factory; 40 Lakhs Damage