‘मनरेगा’च्या कामाबद्दल विचारणा केली म्हणून केला गोळीबार
By Admin | Updated: January 26, 2016 16:07 IST2016-01-26T16:07:34+5:302016-01-26T16:07:34+5:30
नेहमीप्रमाणे ग्रामसभा भरली असता एका व्यक्तीने मनरेगाच्या कामाबद्दल विचारपूस केली म्हणून त्यावर गोळीबार केला गेला.

‘मनरेगा’च्या कामाबद्दल विचारणा केली म्हणून केला गोळीबार
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. २६ - नेहमीप्रमाणे ग्रामसभा भरली असता एका व्यक्तीने मनरेगाच्या कामाबद्दल विचारपूस केली म्हणून त्यावर गोळीबार केला गेला. आज २६ जानेवारीनिमित्त परभणी तालुक्यातील साबळे भोगाव इथं ग्रामसभा भरली असतानाच गोळीबाराची थरारक घटना घडली.ग्राम सभा सुरु असतानाच ‘मनरेगा’च्या कामाबद्दल एका सदस्याने विचारणा केल्याने, या सदस्यावर गोळीबार करण्यात आला.
या गोळीबारात दोघे जण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे उपसरपंच अशामती राऊत यांचा पती मनोज राऊत याने हवेत 3 गोळया झाडल्या. राऊत यांनी झाडलेली गोळी कोणाला लागली नाही, मात्र गोळी चाटून गेल्याने दोघे जण जखमी झाले. या गोळीबारानंतर गावात तणावाचं वातावरण पसरले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.