भिवंडीत प्लॅस्टिक गोदामाला आग, 4 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: February 19, 2017 15:53 IST2017-02-19T15:53:35+5:302017-02-19T15:53:35+5:30

हरिहर कॉम्प्लेक्समध्ये एका प्लॅस्टीकच्या गोदामाला लागलेल्या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

A fire in a watery plastic godown, a fire of 4 people | भिवंडीत प्लॅस्टिक गोदामाला आग, 4 जणांचा मृत्यू

भिवंडीत प्लॅस्टिक गोदामाला आग, 4 जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

भिवंडी, दि. 19 - येथील हरिहर कॉम्प्लेक्समध्ये एका प्लॅस्टीकच्या गोदामाला लागलेल्या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. मात्र, आग लागण्याचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाही. 

आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास  ही आग लागली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला तर  दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मुंबईच्या सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  अग्निशमन दलाकडून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रय़त्न सुरू आहेत. 

Web Title: A fire in a watery plastic godown, a fire of 4 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.