आकाश कंदिलामुळे टॉवरला आग

By Admin | Updated: November 5, 2016 00:04 IST2016-11-05T00:04:43+5:302016-11-05T00:04:43+5:30

पिंपळेगुरव येथील जगताप पाटील इस्टेट बिल्डिंग या इमारतीवरील टॉवरला आकाश कंदिलामुळे आग लागली. त्यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

Fire to the Tower due to sky lanyard | आकाश कंदिलामुळे टॉवरला आग

आकाश कंदिलामुळे टॉवरला आग

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 04 - पिंपळेगुरव येथील जगताप पाटील इस्टेट बिल्डिंग या इमारतीवरील टॉवरला आकाश कंदिलामुळे आग लागली. त्यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
पिंपळेगुरव सुदर्शन नगर येथे जगताप पाटील इस्टेट ही इमारत आहे. चार मजल्याच्या इमारतीवर टॉवर उभारण्यात आला आहे. दिवाळीमुळे फटाक्यांची आतषबाजी होत आहे. त्यामुळे आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. आज सायंकाळी पावणे आठच्या सुमारास आकाशात सोडण्यात येणारे आकाश कंदिल  या परिसरातील कोणतीरी नागरिकांनी आकाशात सोडले. ते दोन आकाशकंदिल जगताप पाटील इमारतीच्या टॉवरला अडकले आणि त्यामुळे आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली. तसेच भयभित झालेल्या इमारतील नागरिक रस्त्यावर येऊन ही घटना पाहत होते. दरम्यान या आगीची माहिती अग्निशामक दलास दिल्यानंतर पिंपरी आणि रहाटणीचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. यावेळी मोठ्याप्रमाणावर नागरिक रस्त्यावर आल्याने वाहतूककोंडीही झाली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून घटनेबाबत माहिती घेत आहेत.⁠⁠⁠⁠

Web Title: Fire to the Tower due to sky lanyard