सीएसटी येथील टाइम्स इमारतीमध्ये आग

By Admin | Updated: August 25, 2016 11:27 IST2016-08-25T11:27:17+5:302016-08-25T11:27:17+5:30

सीएसटी रेल्वे स्थानकाजवळ असणा-या टाइम्स इमारतीमध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती.

A fire in Times Building at CST | सीएसटी येथील टाइम्स इमारतीमध्ये आग

सीएसटी येथील टाइम्स इमारतीमध्ये आग

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - सीएसटी रेल्वे स्थानकाजवळ असणा-या टाइम्स इमारतीमध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती. या इमारतीत टाइम्स समूहाच्या महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी आणि मराठी दैनिकांची कार्यालये आहेत. 
 
टाइम्स इमारतीच्या दुस-या मजल्यावर महाराष्ट्र टाइम्सचे कार्यालय असून, सर्व्हर रुममध्ये प्रथम ही आग भडकली. या आगीमुळे नेमके किती नुकसान झाले त्याची ठोस माहिती नाही.  सध्या टाइम्स इमारतीचा वीजपुरवठा बंद असून, कार्यालय बंद आहे. 
 
या इमारतीत महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचेही कार्यालय असून, कर्मचा-यांची दुस-या ठिकाणहून काम करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी मे महिन्यातही मध्य दिल्लीतील टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागली होती. 

Web Title: A fire in Times Building at CST