आज अग्निपरीक्षा!
By Admin | Updated: November 12, 2014 03:01 IST2014-11-12T03:01:05+5:302014-11-12T03:01:05+5:30
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाला पाठिंबा द्यायचे शिवसेनेने मान्य केल़े त्यामुळे हे जुने मित्रपक्ष सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

आज अग्निपरीक्षा!
भाजपाला दिलासा : शिवसेनेच्या साथीने सरकार तरणार?
यदु जोशी - मुंबई
अवघ्या 24 तासांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणा:या शिवसेनेने मंगळवारी विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारीही कायम ठेवली़ तरीही सत्तेसाठी जमलं तर जमलं, या शिवसेनेच्या भूमिकेवर मंगळवारी भाजपा आणि शिवसेनेनेही हलकेच एक पाऊल पुढे टाकले आणि रात्री उशिरा विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाला पाठिंबा द्यायचे शिवसेनेने मान्य केल़े त्यामुळे हे जुने मित्रपक्ष सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. या ठरावावर भाजपाला शिवसेनेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता अजूनही शिल्लक आहे. तरीही देवेंद्र फडणवीस यांना अल्पमतातील सरकार तारण्यासाठी अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
भाजपा-शिवसेना एकत्र येण्याची कुठलीही शक्यता नाही, असे म्हटले जात होते. तथापि, आज दुपारी नाटय़मय घडामोडी घडल्या आणि जुने मित्र पक्ष पुन्हा एकदा जवळ आले. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दुपारी 3 च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या दालनात जाऊन बंदद्वार चर्चा केली. यावेळी सांसदीय कामकाज मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते. कदम यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काही निरोप फडणवीस यांना सांगितला. सरकारला पाठिंबा देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत शिवसेनेने दिले. तिथूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती आहे.
शिवसेनेला पाच कॅबिनेट तर पाच राज्यमंत्री हवी आहेत. काही प्रमुख खाती त्यांना हवी आहेत. याबाबतचे ठोस आश्वासन मिळण्याची अपेक्षा शिवसेनेने सोडलेली नाही, असे एका नेत्याने सांगितले.
केवळ एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांनी फडणवीस, मेहता, विनोद तावडे यांच्याशी रात्री उशिरार्पयत दूरध्वनीवरून चर्चा केली. बुधवारी सकाळी अंतिम निर्णय अपेक्षित आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत, पक्षाचा निर्णय उद्या सगळ्यांना कळविला जाईल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी युतीची शक्यता कायम ठेवली. फडणवीस सरकार बुधवारी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडणार असून 14क् सदस्य आमच्यासोबत असल्याचे फडणवीस यांनी आज पत्रकारांना सांगितले. भाजपाचे 122, अपक्ष 7, बहुजन विकास आघाडीचे 3 आणि शेकापच्या नेतृत्वातील आठ सदस्य असे हे संख्याबळ असल्याचे ते म्हणाले. आपले सरकार पाच वर्षे स्थिर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपा-शिवसेना सोबत (पान 6 वर)
‘जय विदर्भ’ने गदारोळ
च्‘अखंड महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान होईल, असे कोणतेही शब्द उच्चरू नयेत. जय विदर्भ वगैरे न म्हणता केवळ लिखित स्वरूपातील शपथ घ्यावी, असे निर्देश हंगामी अध्यक्ष गावित यांनी दिलेले असतानाही काटोलचे भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी, शपथेच्या शेवटी दणक्यात जय विदर्भचा जयघोष केला आणि शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले.
च्देशमुख यांनी अध्यक्षांच्या निर्देशांचा अवमान केला आहे, त्यांच्यावर कारवाई करा, अशी जोरदार मागणी सेना आमदार करू लागले. भाजपाचे डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे यांनी आक्रमक होत देशमुख यांची बाजू घेतल्याने गोंधळ अधिकच वाढला. भाजपा-शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले होते.
सारी उत्तरे आज
सर्वाधिक जागा जिंकून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला बुधवारी विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निपरीक्षेत पास व्हावे लागेल. ऐनवेळी कोणता पक्ष भाजपाच्या बाजूने उभा राहणार याचे उत्तर बुधवारीच मिळेल.
140 सदस्य आमच्यासोबत
भाजपाचे 122, अपक्ष 7, बहुजन विकास आघाडीचे 3 आणि शेकापच्या नेतृत्वातील आठ सदस्य असे 140 जण आमच्या सोबत आहेत. - देवेंद्र फडणवीस
पाठिंब्यातून सरकारमध्ये!
सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला तर हा पक्ष सरकारमध्ये लवकरच सहभागी होईल, असे मानले जाते. पाठिंब्यावरून दोन पक्षांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत मंत्रिमंडळात शिवसेनेला किती वाटा देणार हा विषयही आहेच. पाठिंबा देताना सत्तेतील वाटय़ाचे सूत्रही अंतिम केले जाईल, असे सूत्रंनी सांगितले.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभा अध्यक्षपदाकरिता तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये भाजपाचे हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे विजय औटी तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू असला तरी यदाकदाचित निवडणूक झालीच तरी भाजपाच्या बागडे यांचेच पारडे जड आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांच्या उपस्थितीत शिवालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटी
यांना मतदान करावे, असा व्हिप जारी करण्यात आला.