मुंबईत चप्पल दुकानाला आग
By Admin | Updated: December 29, 2016 21:07 IST2016-12-29T21:07:35+5:302016-12-29T21:07:35+5:30
शॉर्ट सर्किटमुळे चेंबूरच्या सिंधी कॉलनी परिसरात लिबर्टी शू मार्ट या चप्पल दुकानाला गुरुवारी अचानक आग लागली.

मुंबईत चप्पल दुकानाला आग
ऑनलाइन लोकमत
चेंबूर, दि. 29 - शॉर्ट सर्किटमुळे चेंबूरच्या सिंधी कॉलनी परिसरात लिबर्टी शू मार्ट या चप्पल दुकानाला गुरुवारी अचानक आग लागली. नेहमीप्रमाणे दुकानात ग्राहक असतानाच सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान दुकानदाराने तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाले. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेत दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय दुकान मुख्य रस्त्यावरून आत असल्याने अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले होते.