राप्ती सागर एक्स्प्रेसच्या बोगीमध्ये आग
By Admin | Updated: November 21, 2014 01:58 IST2014-11-21T01:58:28+5:302014-11-21T01:58:28+5:30
राप्ती सागर एक्स्प्रेसच्या जनरल बोगीमध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी माजरी स्थानकाजवळ घडली.

राप्ती सागर एक्स्प्रेसच्या बोगीमध्ये आग
वरोरा (जि़ चंद्रपूर) : राप्ती सागर एक्स्प्रेसच्या जनरल बोगीमध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी माजरी स्थानकाजवळ घडली. बोगी प्रवाशांनी भरलेली असल्याने एकच गोंधळ उडाला़ प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबवत रेल्वेतील अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही़
त्रिवेंद्रम-गोरखपूर ही राप्तीसागर एक्स्प्रेस भद्रावती व माजरी रेल्वे स्थानकाच्या देवूरवाडाजवळ गुरुवारी दुपारी २.४५ वाजता आली असता मागून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जनरल बोगीत आग लागली. त्या वेळी डब्यातील प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबविली. पेंट्री सेक्शनमधून अग्निशामक बंब आणून आगीवर नियंत्रण मिळविले. माजरी स्थानकावर रेल्वे आल्यानंतर तज्ज्ञांकडून आग लागलेल्या बोगीसह संपूर्ण रेल्वेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर गाडी रवाना झाली.