शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पुन्हा एकदा अग्नितांडव! एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 14:25 IST

कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवाच्या आठवणी ताज्या असतानाच बुधवारी रात्री पुन्हा एकदा भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले. अंधेरीमधील मरोळ परिसरातील मैमून इमारतीला बुधवारी रात्री दोनच्या सुमाराच भीषण आग लागली.

मुंबई - कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवाच्या आठवणी ताज्या असतानाच बुधवारी रात्री पुन्हा एकदा भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले. अंधेरीतील मरोळ परिसरातील रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अन्य 7 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मरोळ परिसरातील मैमून नावाच्या रहिवासी इमारतीच्या तिस-या मजल्यावर ही दुर्घटना घडली आहे. मोईन कपासी (वय 80 वर्ष), तस्लीम कपासी (वय 42 वर्ष), सकीना कपासी (वय 13 वर्ष) , मोईज कपासी (वय 8 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना कुपर व मुकुंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली आहे, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर कपासी कुटुंबीयांपैकी एक जण घरातून बाहेर पडला. यावेळी घराचा दरवाजा लॉक झाला. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य घरातच अडकून पडले. आगीची तीव्रता वाढू लागल्यानंतर हे सर्वजण घराच्या खिडकीपाशी आले. येथून ते तब्बल अर्धा तास मदतीसाठी आक्रोश करत होते. मात्र, खिडकीला असलेल्या लोखंडी जाळीमुळे नागरिकांना त्यांना मदत करता आली नाही आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. 

तर दुसरीकडे, अग्निशमन दल घटनास्थळी उशीरा पोहोचल्यानं चार जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अग्निशमन दलानं आरोप फेटाळून लावत, इमारतीकडे जाण्यासाठीची वाट खूपच अरूंद असल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.   

 

गेल्या आठवड्यात लोअर परेल परिसरातील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री उशिरा 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.

टॅग्स :fireआगMumbaiमुंबई