पुर्णा येथे पॅसेंजरच्या डब्याला आग

By Admin | Updated: April 4, 2015 04:25 IST2015-04-04T04:25:18+5:302015-04-04T04:25:18+5:30

येथील रेल्वे यार्डात दुरुस्तीसाठी उभ्या पॅसेंजर रेल्वेच्या डब्याला अचानक आग लागल्याची घटना २ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Fire at the passenger cab at Purna | पुर्णा येथे पॅसेंजरच्या डब्याला आग

पुर्णा येथे पॅसेंजरच्या डब्याला आग

पूर्णा (जि़ परभणी) : येथील रेल्वे यार्डात दुरुस्तीसाठी उभ्या पॅसेंजर रेल्वेच्या डब्याला अचानक आग लागल्याची घटना २ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
हैदराबाद-पूर्णा पॅसेंजर (क्रमांक ५७५४७) ही रेल्वे दैनंदिन वेळेप्रमाणे पूर्णा रेल्वेस्थानकात २ एप्रिल रोजी रात्री ९.३० च्या सुमारास पोहोचली. मुक्कामी असणारी ही गाडी किरकोळ तपासणी व स्वच्छतेसाठी यार्डातील गोदीमध्ये लावण्यात आली. मध्यरात्री १२ च्या सुमारास या परिसरातून धूर निघत असल्याचे कर्मचारी व प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान रेल्वे गाडीचा डब्बा क्रमांक ९८४०४ पेटला होता. तत्काळ पूर्णा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुमारे एक तासाच्या अथक परिश्रमानंतर डब्यातील आग विझविण्यात यश आले. (प्रतिनिधी)

Web Title: Fire at the passenger cab at Purna