गोरेगावच्या हब मॉलमधील आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2016 14:07 IST2016-12-28T14:04:25+5:302016-12-28T14:07:36+5:30

गोरेगाव पूर्व परिसरातील हब मॉलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली होती.

Fire in Goregaon Hub Mall | गोरेगावच्या हब मॉलमधील आग आटोक्यात

गोरेगावच्या हब मॉलमधील आग आटोक्यात

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 -  गोरेगाव पूर्व परिसरातील हब मॉलमध्ये बुधवारी आग लागल्याची घटना समोर आली. दुपारी 12.20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. फायर ब्रिगेडने अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आगी विझवण्यासाठी घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या आणि पाण्याचे चार टँकर दाखल झाले होते.
 
 
दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खबरदारी म्हणून संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला होता. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 
 
 
 
 

Web Title: Fire in Goregaon Hub Mall