काळबादेवीमध्ये इमारतीला आग, अग्नीशमन दलाचे तीन जवान जखमी
By Admin | Updated: May 9, 2015 21:00 IST2015-05-09T20:58:06+5:302015-05-09T21:00:28+5:30
जुन्या हनुमान गल्लीमध्ये लाकडी इमारतीला लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत.

काळबादेवीमध्ये इमारतीला आग, अग्नीशमन दलाचे तीन जवान जखमी
>ऑनलान लोकमत
मुंबई, दि. ९ - जुन्या हनुमान गल्लीमध्ये लाकडी इमारतीला लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत.
काळबादेवी येथील गोकुळ निवास येथील ३३ क्रमांकाची इमारत पुर्णतः लाकडी असल्याने आग आटोक्यात आणणे कठिण असले तरी, अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच घटनास्थळी २२ बंब दाखल झाले असून गेल्या अडीच तासांहून अधिक काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत असून दोन अधिकारी बेपत्ता असल्याचे डेप्यूटी चीफ ऑफिसर रहांगदाले यांनी सांगितले आहे. तसेच या इमारतीचा दुसरा भाग पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून शेजारच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.