एलफिन्स्टनच्या नमन मिडटाऊनला आग

By Admin | Updated: June 22, 2014 00:58 IST2014-06-22T00:58:58+5:302014-06-22T00:58:58+5:30

एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाशेजारील नमन मिडटाऊन या व्यावसायिक इमारतीला संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली

A fire in Elphinstone's Naman Midtown | एलफिन्स्टनच्या नमन मिडटाऊनला आग

एलफिन्स्टनच्या नमन मिडटाऊनला आग

>मुंबई : एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाशेजारील नमन मिडटाऊन या व्यावसायिक इमारतीला संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली आणि 21व्या मजल्यार्पयत धुराचे लोळ पसरले. आग लागली तेव्हा इमारतीत 25 ते 3क् अधिकारी कर्मचारी अडकले होते. मात्र अग्निशमन दलाने सर्वाना सुखरूप बाहेर काढले.
नमन मिडटाऊन इमारतीला 15 व 21 माळ्यांच्या दोन विंग आहेत. 21 मजली इमारतीच्या पहिल्या माळ्यावर वेल्डिंगचे काम सुरू होते. त्या वेळी आग लागली आणि ती वरच्या दिशेने पसरत गेली. इमारतीत विविध कंपन्यांची कार्यालये आहेत. आग लागली तेव्हा अनेक कार्यालये सुरू होती. आगीची माहिती मिळताच अनेक कर्मचारी बाहेर पडले. त्यापैकी 25 ते 3क् कर्मचारी आत अडकले होते. त्या सर्वाना अग्निशमन दलाने बाहेर काढले. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या तळमजल्यावरील एसी प्लान्टमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. पोलीस दोन्ही शक्यता पडताळून पाहत आहेत.
अग्निशामक दलाचे 8 फायर इंजीन, 4 टँकर व रुग्णवाहिका अशी एकूण 25 वाहने बचावकार्यात सहभागी झाली होती. इमारतीखाली बघ्यांची गर्दी झाल्याने काही काळ या परिसरात वाहतूककोंडीही झाली होती.  इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याचे अग्निशामक अधिकारी शशिकांत काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: A fire in Elphinstone's Naman Midtown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.