सॅमसंगच्या गोडाऊनला लागलेल्या आगीवर नियंत्रण

By Admin | Updated: November 3, 2016 07:28 IST2016-11-03T00:54:41+5:302016-11-03T07:28:58+5:30

औरंगाबादमधील वाळूंज येथील बाफना मोटर्स शेजारी आग लागल्याची घटना घडली आहे.

Fire control over Samsung's Godown | सॅमसंगच्या गोडाऊनला लागलेल्या आगीवर नियंत्रण

सॅमसंगच्या गोडाऊनला लागलेल्या आगीवर नियंत्रण

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 3 -  औरंगाबादमधील वाळुंज येथील बाफना मोटर्स शेजारील सॅमसंगच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीवर अग्निशामक दलाला नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. जवळपास 5 तास ही आग धुमसत होती. आगीत 500 फ्रीज, 500 वॉशिंग मशिन जळून खाक झाल्या आहेत. आगीत मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असून, सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागली त्यावेळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. 
सॅमसंग कंपनीच्या एका गोडाऊनला लागलेली ही आग शेजारच्या परफ्यूम कंपनीपर्यंत पोहोचली होती. अग्निशामक दलाचे जवान आग विझविण्याच्या प्रयत्न करत असताना आग आणखी भडकत होती. ही आग मोठी असल्यानं नियंत्रण मिळवण्यास वेळ लागला. दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Fire control over Samsung's Godown