अंधेरीत व्यावसायिक इमारतीला आग

By Admin | Updated: May 16, 2015 11:51 IST2015-05-16T11:39:55+5:302015-05-16T11:51:42+5:30

अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एका व्यावसायिक इमारतीला आज सकाळी आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Fire in a commercial building in the dark | अंधेरीत व्यावसायिक इमारतीला आग

अंधेरीत व्यावसायिक इमारतीला आग

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ -  अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एका व्यावसायिक इमारतीला आज सकाळी आग लागली. वीरा देसाई रोडवरील या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यालये असून सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग  विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान इमारतीतील सर्व कर्मचा-यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

 

Web Title: Fire in a commercial building in the dark