अंधेरीत व्यावसायिक इमारतीला आग
By Admin | Updated: March 25, 2015 12:49 IST2015-03-25T11:28:10+5:302015-03-25T12:49:33+5:30
अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरातील एका सातमजली इमारतीला बुधवारी सकाळी आग लागली.

अंधेरीत व्यावसायिक इमारतीला आग
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि, २५ - अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरातील एका सातमजली इमारतीला बुधवारी सकाळी आग लागली. कनकिया या व्यावसायिक इमारतीच्या दुस-या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट झालेले नाही.