एक्सप्रेस वेवर कोळशांच्या ट्रकला लागली आग
By Admin | Updated: April 20, 2017 21:59 IST2017-04-20T21:59:51+5:302017-04-20T21:59:51+5:30
पुण्याहून मुंबईच्या दिशेने कोळसा घेऊन जाणार्या ट्रकला आज रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळील औंढे पुल येथे अचानक आग लागल्याने

एक्सप्रेस वेवर कोळशांच्या ट्रकला लागली आग
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि.20 - पुण्याहून मुंबईच्या दिशेने कोळसा घेऊन जाणार्या ट्रकला आज रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळील औंढे पुल येथे अचानक आग लागल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या अपघाता कसलिही जिवितहानी झाली नाही.
कोळसा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेला एक ट्रक औंढे पुलाजवळ आला असता त्याला अचानक आग लागली व कोळश्याचे पेट घेतला. ही घटना घडली त्याच्या जवळच आयआरबी कंपनीचे मेन्टन्स कार्यालय असल्याने तातडीने घटनास्थळी पोहचलेले आयआरबी अग्नीशमन बंब, आर्यन देवदूत व लोणावळा नगरपरिषद अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आली मात्र कोळसा पेटत असल्याने क्रेनच्या सहाय्याने ट्रकमधून कोळसा खाली पाडत विझविण्यात आला. साडेनऊच्या सुमारास ही आग विझविण्यात आल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतुक सुरु करण्यात आली.