शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जवान ऐकू शकणार ''त्या'' जीवांची आर्त हाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 14:37 IST

पाण्यात बुडालेल्या , ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांची वाचविण्याची आर्त हाक अग्निशामक विभागाच्या जवानांना ऐकता येणार आहे. 

ठळक मुद्देअग्निशामक विभागाच्या ताफ्यात 'पाण्याखालील शोध कॅमेरा' दाखल त्या माणसांना आम्ही वाचविण्याचा प्रयत्न करतोय, घाबरू नका, असा संदेश देऊ शकणार

योगेश्वर माडगूळकर- पिंपरी : शहरात इमारत पडली, त्याखाली कोणी अडकले, त्यातील काही लोक ढिगाऱ्याखाली जिवंत असतील, तर त्यांचा जीव वाचविण्याची आर्त हाक अग्निशामक विभागाच्या जवानांना ऐकता येणार आहे. एवढेच नव्हे तर जवान त्या माणसांना आम्ही वाचविण्याचा प्रयत्न करतोय, घाबरू नका, असा संदेश देऊ शकणार आहेत. इतकेच नव्हे तर पाण्याखाली बुडालेल्या व्यक्तीचे नेमके ठिकाणही जवानांना शोधता येणे शक्य होणार आहे, ही किमया आहे अग्निशामक विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या 'पाण्याखालील शोध कॅमेरा' या उपकरणाची. हे उपकरण मुंबईतील एका कंपनीने तयार केले आहे. महापालिकेत हे यंत्र प्रायोगिक तत्त्वावर दाखल झाले आहे.याबाबत माहिती देताना अग्निशामक विभागाचे मुख्य अधिकारी किरण गावडे म्हणाले, या यंत्राचा वापर करून पाण्याखाली बुडालेल्या व्यक्तीचे नेमकं ठिकाण शोधता येते. या कॅमेऱ्याची क्षमता २ मेगा फिक्सल आहे. त्याला वायर आहे. तसेच रात्रीच्या वेळी परिस्थिती हातळण्यासाठी एलईडी लाईटची व्यवस्था आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीही शोधकार्य करता येईल. या उपकरणाला डीव्हीआर युनिट आहे. त्याला एलईडी स्क्रीन आहे. त्यासोबत पन्नास मीटर वायर आहे. त्यामुळे इतर जवानांना पाण्याखालील परिस्थिती दिसणार आहे. या उपकरणाचा विहिरीच्या ठिकाणी प्रभावीपणे वापर करता येणार आहे. या कॅमेऱ्याचा वापर इमारत पडण्यासारखी दुर्घटना घडल्यास करता येणार आहे. ढिगाऱ्याखाली छोटसे छिद्र पाडून आतमध्ये कॅमेरा सोडता येतो. या कॅमेऱ्याला हेडफोन लावता येतात. तसेच एअर फोन ही असतो. त्यामुळे दुर्घटनेमध्ये नेमका माणूस कुठे अडकला आहे. तो जिवंत आहे का, त्याचा आवाज ही पथकाला ऐकता येणार आहे. तसेच स्टेटस्कोपच्या माध्यमातून त्याचा श्वासोच्छवास सुरू आहे का ते कळणार आहे़. ऑडिओच्या माध्यामातून पथकातील कर्मचारी त्याच्याशी संवाद साधू शकणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व टॅबवरतीही शेअर करता येणार आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी आलेल्यांना हे दृश्य पाहता येणार आहे, असे गावडे यांनी सांगितले.

* पवना नदीत उडी मारल्याने एक तरुण बुडाला. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारला ही घटना घडली होती. या घटनेमध्ये मृताचा शोध घेण्यासाठी या यंत्राचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या यंत्राच्या साह्याने जवान मृताचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातdrowningपाण्यात बुडणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलBuilding Collapseइमारत दुर्घटना