पुण्यातील शुक्रवार पेठेत 2 वाड्यांमध्ये अग्नितांडव, एकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 3, 2017 11:33 IST2017-05-03T08:38:22+5:302017-05-03T11:33:20+5:30

पुणे येथील शुक्रवार पेठेतील दोन वाड्यांना भीषण आग लागली होती. या अग्नितांडवात एकाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे 4 जवान जखमी झालेत.

Fire brigade in Pune, two deaths in fire; | पुण्यातील शुक्रवार पेठेत 2 वाड्यांमध्ये अग्नितांडव, एकाचा मृत्यू

पुण्यातील शुक्रवार पेठेत 2 वाड्यांमध्ये अग्नितांडव, एकाचा मृत्यू

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 3 - पुणे येथील शुक्रवार पेठेतील दोन वाड्यांना भीषण आग लागली. बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अग्नितांडवात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. 
 
प्रवीण बन्सल (वय ४५ ) असे मृत व्यक्तीचे आहे.  अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आहे.
 
शुक्रवार पेठेतील एका तीन मजली जुन्या वाड्याला बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आगली. ही आग शेजारील वाड्यापर्यंत पोहोचली.  दुसऱ्या वाड्याची आग विझवताना भिंत कोसळून अग्निशमन दलाचे चार जवान व स्थानिक नागरिक प्रवीण बन्सल जखमी झाले होते.  त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
दरम्यान ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.  

Web Title: Fire brigade in Pune, two deaths in fire;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.