शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

फेरीवाल्यांना पाठिंबा देणं निरुपमांना भोवणार, संजय निरुपमांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 12:31 IST

मुंबई- मालाड पोलीस ठाण्यात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केलंय.

मुंबई- मालाड पोलीस ठाण्यात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केलंय. विनापरवानगी सभा घेऊन भाषण केल्यानिमित्त संजय निरुपमांविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच संजय निरुपमांनी चिथावल्यामुळेच हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मालाड पश्चिम येथे फेरीवाल्यांना दिलेल्या भेटीदरम्यान संजय निरुपम बोलले होते की, 'फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल'. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती.  ही डेडलाइन संपल्यानंतर ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने आंदोलन सुरु केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासही सुरुवात केली होती. राज ठाकरे यांनी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं होतं. जिथे जिथे अन्याय, गैरप्रकार दिसेल तिथे महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं.दरम्यान राज ठाकरे यांनी आज कल्याण, डोंबिवली शहरातील  विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांची महापालिकेत जाऊन भेट घेतली. शहरातील विविध मुद्यांवरुन यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना फैलावर धरले.  फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक परिणामकारकपणे होण्यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घातले पाहीजे. केवळ खालील अधिकाऱ्यांवर ती जबाबदारी सोपवून फेरीवाले हटणार नाहीत, असं सांगत ही शहरं आपल्याला साफ हवीत की नको? शहर स्वच्छ कधी करणार?, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना विचारला. तसेच कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई का होत नाही, असा सवालही यावेळी त्यांनी आयुक्तांना विचारला. फेरीवाल्यांना जास्तीत जास्त दंड आकाराल्यास त्यांचे वारंवार बसणे कमी होईल. रेल्वेने रेल्वेच्या हद्दीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार महापालिकेनं महापालिकेच्या हद्दीत कारवाई करावी,अशी मागणीही यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली. सोबत, रेल्वेची हद्द आणि पालिकेची हद्द एकदाच निश्चित करण्याचीही मागणीही राज यांनी केली.

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसPoliceपोलिस