शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अबू आझमींचा मुलगा फरहान सापडला अडचणीत; गोव्यात राडा, पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 08:41 IST

गोव्यात सपा नेते अबू आझमी यांच्या मुलाच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Farhan Azmi: औरंगजेबाच कौतुक करणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि शिवाजीनगर-मानखुर्दचे आमदार अबू असीम आझमी चांगलेच वादात सापडले आहेत. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता म्हणून अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महारांजाबाबत विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले. शिवसेना शिंदे गटाने गुन्हा दाखल केल्यानंतर अबू आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. त्यानंतर आता अबू आझमी यांचा मुलगाही अडचणीत सापडला आहे. अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी याच्याविरोधातही एका प्रकरणात गुन्हा दाखल झालाय.

उत्तर गोवा पोलिसांनी अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी आणि इतर लोकांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी भांडण आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मुघल शासक औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या विधानामुळे आमदार अबू आझमी यांना टीकेचा सामना करावा लागत असताना फरहान आझमींविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आझमी पिता पुत्र चांगलेच अडचणीच सापडले आहेत.

सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गोवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कँडोलिम उत्तर गोव्यातील एका सुपरमार्केटजवळ भांडण झाल्याची माहिती मिळाली. भांडणादरम्यान अबू फरहान आझमीने स्थानिक मुलांना त्याच्याकडे कायदेशीर परवाना असलेली बंदूक असल्याचे सांगितले. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना कळंगुट पोलीस ठाण्यात आणलं. मात्र दोन्ही गटांनी तक्रार देण्यास नकार दिला. पोलिसांनी सर्वांना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात म्हापसा येथे न्यायचे ठरवलं. पण ते गेले नाहीत.

त्यानंतर अबू फरहान आझमीने बंदुकीचा परवाना आणि गोव्यात शस्त्र बाळगण्याची परवानगी पोलिसांना दाखवली. कळंगुट पोलिसांनी मंगळवारी सकाळी सर्व आरोपींचे जबाब नोंदवले. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी भांडण, शांतता भंग आणि वाद निर्माण केल्याने पोलीस उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी तक्रार दाखल केली आणि दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये अबू फरहान आझमी, झिऑन फर्नांडिस, जोसेफ फर्नांडिस, श्याम आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

फरहान आझमी मर्सिडीज एसयूव्हीमध्ये प्रवास करत होते. सुपरमार्केटजवळ त्याच्या गाडीने वळण घेतले तेव्हा त्यांच्या मागे असलेल्या एका गाडीतील दोन स्थानिक लोकांनी आझमीशी वाद घातला. लेन बदलत असताना इंडिकेटर न देता फरहानच्या गाडीने वळण घेतल्याचा दावा स्थानिकांनी केला. त्यानंतर वाद सुरू असताना त्या दोघांचे कुटुंबीय आणि स्थानिक लोक  तिथे जमा झाले. त्यांनी आझमी आणि त्याच्या ड्रायव्हरला गाडीतून उतरण्यास सांगितले. यादरम्यान फरहान आझमीने त्याच्याकडे परवाना असलेली बंदूक असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीgoaगोवाCrime Newsगुन्हेगारी